जर तुमच्यासोबत ऑनलाइन फ्रॉड झाला असेल, कोणी तुमचे बँक अकाउंट खाली केले असेल आणि तुम्ही जर कंगाल झाले असाल तर तुम्ही तुमचे सर्व पैसे रिफंड करू शकता. ते मिळवण्याचे तीन प्रकार आम्ही सांगणार आहोत कोणताही एक प्रकार निवडून तुम्ही तुमचे पैसे परत मिळू शकता.
1)ज्या दिवशी तुमच्या सोबत असा प्रकार झालेला आहे, कोणी तुमच्या एटीएम किंवा ओटीपी ने धोक्याने पैसे काढले असतील आणि तुमचं बँक अकाउंट खाली केलेला असेल, तर 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला या हेल्पलाइन नंबर वर कंप्लेंट करावी लागेल .तो हेल्पलाइन नंबर RBI चा असतो. 14440 नंबर वर कॉल करून तुम्हाला तुमच्या सोबत कसा धोका झाला आहे, याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. त्यासोबत तुम्हाला मेल करावा लागेल. सोबत ओटीपी चे मेसेज मेल सोबत अटॅच करावे. ही प्रक्रिया तुमच्यासोबत धोका झाल्याच्या 24 तासाच्या आत मध्ये करावी लागेल. त्यानंतर RBI 90 दिवसाच्या आत मध्ये सर्व तपासणी करून तुमचे पैसे परत मिळूवून देऊ शकते.
2) पैसे गेल्यानंतर जर 24 तास झालेले असतील तर त्यासाठी या दुसऱ्या प्रकारे पैसे मिळू शकतात. 3 दिवसाच्या आतमध्ये ज्या बँकेचे पैसे गेलेले आहेत, त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही एप्लीकेशन द्यायची आहे. त्यासाठी बँक मॅनेजर तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल. त्यामधील सर्व माहिती भरून त्यासोबत ओटीपीच्या मेसेज चा स्क्रीनशॉटची प्रिंट काढून ती त्या एप्लीकेशन सोबत लावायचे आहे. यासोबत अजून एक काम करायचे आहे. बँकेचे हेड ऑफिस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मॅनेजर चा रेफरन्सने मेल पाठवायचा आहे. तुम्हाला सात दिवसाच्या आत मध्ये पैसे परत मिळून जातील.
3) या तीन्ही प्रकारामध्ये तुम्हाला एफ आय आर करावी लागणार आहे.तुमचे पैसे गेल्यानंतर जर सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष गेली असतील. तर या तिसऱ्या प्रकारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुमच्या जवळपास जिथे कोर्ट असेल तिथे एक Legal Aid ऑफीस असते. CRPC 357A(4) नुसार एक एप्लीकेशन फॉर्म असतो त्यामध्ये सर्व माहिती भरून त्यासोबत पुरावे( OTP massage screenshot)जोडावेत व या ऑफिसमध्ये जमा करा तुम्हाला 30 दिवसाच्या आत मध्ये शंभर टक्के पैसे परत मिळतील.
परंतु यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्या दिवशी पैसे गेलेले आहेत त्या दिवशी एफ आय आर नोंदवावी लागेल त्या दिवसापासून साठ दिवसांपर्यंत तुम्हाला वाट पहावी लागेल दरम्यान पोलिसांनी काय केले आणि काही तपास केली नसेल तर CRPC 156(3) नुसार एप्लीकेशन फॉर्म भरून जवळच्या कोर्टात सादर करावे. फॉर्म मिळाल्यानंतर पोलिसांनी काय तपास केला याची चौकशी केली जाते.आणि या रिपोर्टची प्रत Legal Aid मध्ये त्या ॲप्लिकेशन सोबत द्यावी लागेल. त्या रिपोर्टमध्ये नमूद केले असेल की त्या पोलिसांना अपराधीची काही माहिती मिळाली नाही, तर legal aid द्वारे 30 दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतील.
जर तुमच्यासोबत असा काही ऑनलाईन फॉर्म झाला असेल तर वरीलप्रमाणे तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.