चुकीचा नंबर वर पैसे पाठवले? परत मिळवा अशाप्रकारे

सध्या आपण ऑनलाईन माध्यमातून सर्रास पेमेंट करतो. त्यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम या वेगवेगळ्या UPI माध्यामाचा वापर करून पेमेंट करतो. कधी कधी server error मुळे किंवा आपल्या घाईगडबडीमुळे आपण चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवतो. कधी कधी चुकीच्या QR कोडवर आपण पैसे पाठवतो.  आपण मोबाईल नंबरच्या माध्यमातून पेमेंट पाठवतो. तो मोबाईल नंबर जर चुकला, तर त्यावेळेस सुद्धा चुकीच्या व्यक्तीला पैसे जातात.

How To Get Money Back if it goes to wrong number
Payment Made To Wrong Number

पैसे पाठवताना जर ते चुकीच्या व्यक्तीला गेल्यास आपण काय करायला पाहिजे

1)आपण फोन करून आपल्या संबंधित बँकेला संपर्क साधला पाहिजे.

2) बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा

3) बँकेला मेल करा.

4) बँकेच्या शाखेला भेट द्या.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

वरीलपैकी चार गोष्टी केल्यानंतर RBI च्या नियमानुसार चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याची तक्रार आल्यानंतर सात ते पंधरा दिवसांच्या आत यावर उपाय काढणे आवश्यक असते, ही प्रमुख बँकेची जबाबदारी आहे.

तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे.

1)UPI Transaction ID

2) वेळ व दिनांक

3)रक्कम ( किती transfer झाली)

4)बँक पासबुक ( entry मारलेली)

जर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची असेल तर :- wwe.npci.org.in या वेबसाईटवर जावा.

what we do या ऑप्शनवर क्लिक करून UPI ऑप्शन मधील Dispute Redressal Mechanism मधील complaint मध्ये सर्व माहिती भरणे व submit करणे.

(wwe.npci.org.in — what we do — upi — Dispute Redressal Mechanism — complaint — Submit)

ही माहिती बँकेकडे जाते आणि बँकेकडे गेल्यानंतर तुम्हाला सात ते पंधरा दिवसांमध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातात .

अशा पद्धतीने  चुकीच्या माध्यमातून जर पैसे सेंड झाले असेल तर घाबरण्याची गरज नाही. वरीलप्रमाणे गोष्टी केल्यास  तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top