Mortgage Loan – आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो. पैशांची गरज कधी लागेल हे सांगता येत नाही. पण ज्यावेळी पैसा गरजेचा असतो त्याचवेळी मात्र आपल्याकडे पैसे नसतात. अशावेळी आपल्याकडे तीनच पर्याय उरतात. ते म्हणजे एखाद्याकडून उसने पैसे घेणे किंवा आपली मालमत्ता विकणे तसेच बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेणे. पण बँकेकडून कर्ज घेताना बँक तुम्हाला काहीतरी तारण मागत असतील. त्यालाच आपण मॉर्गेज लोन असेही म्हणतो. आज आपण मॉर्गेज लोन (Mortgage Loan) काय असते? त्यासाठी अर्ज कसा करावा यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आता ज्यावेळी आपल्याला पैशांची गरज भासते अशावेळी पैसे नसताना आपण बँकेकडे कर्जासाठी जातो. पण त्यावेळी बँक तुम्हाला काहीतरी तारण ठेवण्यास सांगते. अशावेळी तुम्ही तुमच्याकडे असलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवू शकता. याच मालमत्तेच्या जोरावर बँक तुम्हाला विश्वासाने कर्ज देते. आता ज्यावेळी तुमच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही तुमचे राहते घर बँकेकडे गहाण ठेवू शकता.
सध्या बाजारात विविध गोष्टींसाठी कर्ज मिळते. जसे की पर्सनल लोन, बिझनेस लोन, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन अशाप्रकारे विविध लोन मिळतात. आता आपण पाहूयात मॉर्गेज लोन बद्दल. तर मित्रांनो मॉर्गेज लोनचे दोन प्रकार आहेत. ओरल मॉर्गेज लोन (Oral Mortgage Loan) आणि रजिस्टर मॉर्गेज लोन (Registered Mortgage Loan) हे आहेत.
मॉर्गेज लोनचे फायदे कोणकोणते असतात?
आता आपण मॉर्गेज लोणचे फायदे काय आहेत हे पाहूयात.
मॉर्गेज लोन घेण्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. मॉर्गेज लोणच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त कर्जाची रक्कम मिळवू करू शकतो. तसेच तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा उद्योग व्यवसायासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज घेण्यासाठी मॉर्गेज लोन घेणे फायद्याचे ठरते.
त्याचबरोबर तुम्हाला मॉर्गेज लोन घेण्यासाठी वेळही कमी लागतो आणि डॉक्युमेंट देखील जास्त लागत नाहीत.तसेच तुम्ही बँकेने दिलेल्या कालावधीच्या आत कर्ज फेडले तर तुम्हाला बँकेकडून सिबील सकोर जास्त असल्यामुळे अनेक ऑफर्स देखील मिळतात.
मॉर्गेज लोन मिळवण्यासाठी काय पात्रता हवी?
तुम्हाला मॉर्गेज लोन मिळवण्यासाठी तुम्ही एक निश्चित रोजगार व्यक्ती असणे गरजेचे आहे.
तसेच मोरज लोन साठी तुम्ही भारताचे नागरिक असणे महत्त्वाचे आहे.
त्याचबरोबर मॉर्गेज लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय 23 ते 25 असावे लागते. तसेच हे लोन तुम्हाला 65 ते 70 वय होईपर्यत फेडता येते.
तसेच तुम्हाला लोन किती द्यायचे तसेच तुमची लोन फेडण्याची क्षमता किती आहे. हे ठरवण्यासाठी सिबिल स्कोर आणि तुमचा इन्कम देखील चेक केला जातो.
मॉर्गेज लोन प्राप्त करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे काय आहेत?
- ओळखपत्र( आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
- पासपोर्ट साइज फोटो,
- प्रॉपर्टी डॉक्युमेंट
- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, इत्यादी.
मॉर्गेज लोनसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाईन पद्धतीने मॉर्गेज लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ही प्रक्रिया पाहुयात.
- तुम्हाला सर्वप्रथम मॉर्गेज लोनच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला मॉर्गेज लोनच्या वेबसाईटवर तुमच्या प्रॉपर्टीच्या किमतीनुसार मॉर्गेज लोनची पात्रता निवडावी.
- मॉर्गेज लोन साठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ती तपासून त्याची पूर्तता करावी.
- यानंतर विचारलेली सर्व माहिती भरून मॉर्गेज लोन साठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
- तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.
यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन लोनसाठी तारण ठेवून कर्ज घेऊ शकता