Investment In Real Estate | रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीतून बना कोटधीश! फक्त ‘या’ 6 गोष्टींचा करा विचार 

Investment In Real Estate | असं म्हणतात की कितीही पैसा आला तरी तो हातात राहत नाही. कारण पैसा येण्याला एक वाट असते पण जाण्याला दहा वाटा असतात. त्यामुळे आलेला पैसा योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठेवला तरच तो फायद्याचा ठरतो. याच कारणामुळे सध्या रिअल इस्टेटमध्ये लोक जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहेत. लोकांचा रिअल इस्टेट खरेदी करण्याचे वाढते प्रमाण पाहता गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राचे खरेदीचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु तरीदेखील गुंतवणूकदार जोखीम घेत रिअल इस्टेटची खरेदी करतातच.

investment in real estate
investment in real estate

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे प्रचंड फायद्याचे ठरते. परंतु गुंतवणूकदारांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर त्यांना नक्कीच मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. जर तुम्ही कुठेही रिअल इस्टेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्या संबंधित सखोल माहिती घेतली पाहिजे. जर गुंतवणूकदार कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी त्यास विषयी संपूर्ण माहिती तसेच रिसर्च करणे गरजेचे आहे. यानंतर गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक करावी. कारण रिअल इस्टेटमध्ये जितका फायदा आहे तितकीच जोखीम देखील पत्करावी लागते. म्हणूनच प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे, चला तर मग जाणून घेऊयात. 

प्रॉपर्टीचे लोकेशन

तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला प्रॉपर्टी चे लोकेशन पहावे लागेल. प्रॉपर्टी चे लोकेशन हे फार महत्त्वाचे असते ज्याचं कारण म्हणजे प्रॉपर्टीच्या लोकेशन वरूनच प्रॉपर्टीचे मूल्य ठरत असते. तुम्ही जितका परिसर चांगला निवडा तितकाच तुमच्या प्रॉपर्टीला चांगला भाव मिळतो. ज्यावेळी बिल्डर तुमच्याकडून या प्रॉपर्टीची खरेदी करतात त्यावेळी बिल्डर लोकेशन चेक करतात. या लोकेशन वरूनच तुमच्या इस्टेटला किती दर मिळेल हे ठरते. म्हणून ही गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

प्लॅन बनवताना अगोदर ध्येय पहा

रिअल इस्टेट खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे याबद्दल निर्णय घेणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला रिअल इस्टेट खरेदी करून लगेच ते विकून ताबडतोब नफा मिळवायचा आहे की दीर्घकाळासाठी भाड्यातून नफा मिळवायचा आहे. या गोष्टीवर योग्य विचार करणे आवश्यक आहे. 

पैशांचा बजेट पाहणे आवश्यक

आता तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या बजेटचा देखील विचार करावा लागेल. कारण रिअल इस्टेट खरेदी करताना तुम्हाला पैशांचा योग्यरीत्या आणि प्लॅनसहित वापर करणे गरजेचे आहे. पैशांचे पूर्ण प्लॅनिंग केल्यास तुम्हाला पुढे कोणतीही अडचण येत नाही.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

योग्य धोरण ठरवावे

तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी योग्य धोरण ठेवावे लागेल. त्याचवेळी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट त्याचबरोबर जोखीम आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा विचार करणे आवश्यक आहे. सध्याचा मार्केटचा कल आणि आर्थिक परिस्थिती या गोष्टींचा विचार करणे ही आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या धोरण ठरवावे लागेल. 

योग्य मार्गदर्शन घ्यावे

आता रिअल इस्टेट खरेदी करणे ही काही साधी गोष्ट नाही. त्यामध्ये तुम्हाला जोखीम पत्करावी लागते. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेण्याची प्रचंड गरज असते. म्हणूनच तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरते. कारण यामध्ये गुंतवणूक करणे वाटते तितके सोपे नाही. 

सुरुवात करा परंतु छोट्या स्वरूपात

कुठल्याही क्षेत्रात उतरायचं म्हटलं की सुरुवात ही छोट्या स्वरूपातूनच करावी लागते. मग हे तर रिअल इस्टेट खरेदीचे क्षेत्र आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना जोखीम घ्यावे लागते. म्हणूनच तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल तर सुरुवातीला तुम्ही एक किंवा दोनच मालमत्ता खरेदी करणे योग्य असेल. म्हणजेच तुम्हाला यातून जर नुकसान झाले तर तुम्ही ते नुकसान सहजपणे हाताळू शकता. यातून आलेल्या अनुभवातून तुम्ही पुढे पुढील योजना आखू शकता. अशाप्रकारे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळवू शकता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top