Home Loan Process for Non Salaried सर्वसामान्यांसाठी गृहकर्ज अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. कारण एका पेमेंटमध्ये घर घेण्याइतक्या घरांच्या किंमती आता राहिलेल्या नाहीत. एखाद्याची कमी मिळत असेल तर विविध बँक किंवा वित्तीय संस्था त्यांना गृहकर्ज उपल्बध करुन देतात. हे गृहकर्ज नोकरदारांना सहज मिळून जाते. कारण त्यांच्याकडे दरमहिना पगार बँकेत जमा होण्याचा पुरावा म्हणजे पेमेंट स्लीप असते परंतु प्रश्न निर्माण होतो नोकरदार नसणाऱ्यांसाठी. कारण त्यांच्याकडे ठराविक रक्कमेच्या मिळकतीचा पुरावा नसतो त्यामुळे सगळ्याच बँका आणि वित्तिय संस्था अशा नोकरदार नसलेल्या ग्राहकांना गृहकर्ज नाकारते.
नोकरदार नसलेल्यांसाठी आनंदाची बातमी
नोकरदार नसलेल्यांसाठी गृहकर्ज मिळवणे ही अत्यंत कष्टाची गोष्ट झाली होती परंतु आता तसे राहणार नाही. केंद्रिय मंत्रालयांतर्गत या समस्येवर उत्तर शोधण्यात आले आहेत आणि काही नियमांमध्ये अपडेट देखील करण्यात आले आहेत. यापुढे नोकरदारांना त्यांची पेमेंट हिस्ट्री दाखवून गृहकर्ज मिळवता येणार आहे. कोणत्याही पेमेंट स्लीपची गरज नाही की कोणत्याही परमनंट नोकरीची गरज नाही. तुमचे आर्थिक व्यवहार नीट असतील तर तुम्ही नोकरदार नसूनही गृहकर्ज अगदी सहज आणि सोप्या मार्गाने मिळवू शकणार आहात.
अर्थ मंत्रालयाकडून करण्यात येणार संबंधित नियमांची घोषणा
लघु व मध्यम उद्योगांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली असून अर्थमंत्रालय यासंदर्भातील तरतुदींवर काम करत आहे. त्यानुसार मध्यम उद्योग आणि उद्योगांचा क्रेडिट स्कोअर ठरवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांची त्यांची अंतर्गत व्यवस्था उभी करण्याची परवानगी केंद्रिय अर्थमंत्रालयामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे आता बँका अशा उद्योगांचा क्रेडिट स्कोअर त्यांच्या बॅलेन्स शीटवरून नव्हे तर त्यांनी केलेल्या डिजिटल व्यवहारांवरून गृहकर्ज किंवा कोणतेही कर्ज मंजूर करु शकणार आहेत. “छोट्या व मध्यम उद्योगांसाठी झालेल्या घोषणेप्रमाणेच आम्ही गृहनिर्माण क्षेत्रासाठीही तशीच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहोत. सध्या ज्यांना नोकरी आहे किंवा जे प्राप्तीकर परताव्याचा लाभ घेतात, अशाच व्यक्तींना अधिकृत बँकांकडून गृहकर्ज दिलं जातं. ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत, त्यांचा क्रेडिट स्कोअर ठरवण्यासाठी बँका या व्यक्तींनी केलेल्या डिजिटल व्यवहारांचा आढावा घेऊ शकणार आहेत Home Loan Process for Non Salaried
कधीपासून ही नवीन सुविधा उपलब्ध होणार?
येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत नोकरदार नसलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा करण्यात येणार आहे. अशी माहिती अर्थमंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला अपडेट करीतच राहू अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये सामील व्हा. Home Loan Process for Non Salaried