सध्याच्या काळात बाईक ही खूप महत्त्वाची आहे. कारण कुठेही जायचं म्हटलं की बाईक जवळ असली की सोयीचं पडतं. त्याचबरोबर तरुणांमध्ये नवीन बाईक खरेदी करण्याची क्रेझही निराळीच आहे. त्यामुळे आणि दुसरीकडे बाजारात नवनवीन बाइक्स लॉन्च होत आहेत. परंतु बाईक खरेदी करताना मायलेज आणि आपल्या बजेट प्रमाणे खरेदी करत असतो. मग या दोन्ही गोष्टींचा विचार करून ग्राहक कोणती बाईक घ्यायची हे ठरवतात. तसं पाहायला गेलं तर लाखांच्यावर कितीतरी महागड्या बाईक आहेत. परंतु एक लाखातपेक्षा कमी किमतीत देखील जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक्स (Honda Levo Bike) उपलब्ध आहेत. चला तर मग आज आपण अशाच एका बाईकबद्दल जाणून घेऊयात ज्याची किंमतही कमी आहे आणि मायलेजही उत्तम आहे.
आता प्रसिद्ध कंपन्यांबदल बोलायचे झाले, तर हिरो, होंडा तसेच बजाज, सुझुकी आणि यमाहा या कंपन्यांच्या बाईक सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. परंतु या कंपन्यांमध्ये होंडा आणि हिरो बजाजच्या बाइक्स सर्वाधिक विकल्या जातात म्हणजेच या बाईक्सला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे या कंपन्यांपैकी तुम्हाला जर बाईक खरेदी करायची असेल आणि त्यातली त्यात होंडाची बाईक खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण आज आम्ही तुम्हाला होंडाच्या अशा बाईक बद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला परवडणारी आहे आणि मायलेजही जबरदस्त देणारी आहे.
होंडा लिव्होचे वैशिष्ट्य काय आहेत?
HONDA LIVO ही बाईक सर्वात उत्तम आहे. या बाईच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर या बाईकला 109.51cc क्षमतेचे पावरफुल इंजिन आहे. तसेच ही बाईक 8.6 बीएचपी पावर आणि ९.३एनएम टॉर्च जनरेट करते. त्याचबरोबर तुम्ही जर या बाईच मायलेज बद्दल विचार केला तर होंडा कंपनीचा असा दावा आहे की, ही बाईक साधारण 60 किलोमीटर मायलेज देते. त्यामुळे मायलेजचेही जबरदस्त वैशिष्ट्य या बाईकमध्ये मिळते. होंडा कंपनीने ही नवीन बाईक लॉन्च केली आहे. जी नवीन जनरेशन साठी फायद्याचे ठरते. तसेच या बाईकमध्ये डिजिटल कन्सोल देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रम ब्रेक आणि कंबाइन ब्रेकिंग सिस्टम देखील या बाईकमध्ये देण्यात आली आहेत. याच कारणामुळे बाईकच्या दोन्ही टायरवर उत्तम नियंत्रण मिळते.
किती आहे HONDA LIVO ची किंमत?
आता जर या बाइकच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक एक्स शोरूम मध्ये 79 हजार 950 रुपयांना विकली जाते. तसेच या बाइकच्या टॉप मॉडेलची किंमत 1 लाख 3 हजार रुपये इतकी आहे. होंडा लिओ बाइकची टॉप स्पीड जवळपास 110 किमी प्रति तास आहे. तसेच या बाईकला 9 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या बाईकला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहे. त्याचबरोबर या बाईच्या टायरची साईज 18 इंचाची आहे.