Gold And Silver Rate: केंद्र सरकारचे अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर झाले आहे. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय म्हणजे सोनं. मागील काही वर्षात थोडे थोडे करीत सोन्याचे भाव गगनाला लागले होते. सोन्याचे दर 70 हजारापर्यंत पोहोचलेले असताना सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे अशक्यप्राय गोष्ट होऊन बसली होती. परंतु यावर्षी अर्थसंकल्पात सोन्याच्या कस्टम ड्यूटी विषयी घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात नेमके काय सांगण्यात आले आहे हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊ. सोने स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांचे किती पैसे वाचणार आहेत हे देखील आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत,
काय आहे अर्थसंकल्पातील घोषणा?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी घट करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर 15% कस्टम ड्युटी लावली जात होती परंतु यंदाच्या बजेटनुसार सोन्या चांदीच्या दागिन्यांवर 6% कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. तर प्लॅटिनमवर 6.4% टक्के कस्टम ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिन्ही प्रकारचे दागिने येत्या काळात स्वस्त होणार आहेत. याचेच कारण म्हणजे मोठ्याप्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढण्याचे हे संकेत आहेत. Gold And Silver Rate
असे आहेत अर्थसंकल्पातील निर्णय
·सोन्याचा कॉईनवरील कस्टम ड्यूटी म्हणजेच आयात शुल्क 15% वरून 6% पर्यंत कमी केले. सोन्याचं बिस्कीटावरील आयात शुल्क १४.३५% वरून ५.३५% इतके कमी करण्यात आले आहे.
·चांदीची नाण्यांवरील आयात शुल्क 15% वरून 6% केले. चांदीच्या बिस्कीटांवरील आयात शुल्क १४.३५% वरून ५.३५% करण्यात आला आहे.
·प्लॅटिनम, पॅलेडियम, ऑस्मियम, रुथेनियम, इरिडियम वरील आयात शुल्क 15.4% वरून 6.4% पर्यंत कमी केले
·मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क 15% वरून 6% करण्यात आले आहे. सोने/चांदीचे दागिनेयांवरील आयात शुल्क 15% वरून 6% केले आहे.
सोन्याच्या खरेदीमध्ये इतके पैसे वाचतील
आज जर तुम्हाला 10 ग्रॅम सोन्याचे तेही 22 कॅरेटमध्ये दागिने खरेदी करायचे असल्यास त्याची सध्याची किंमत 67,510 रुपये इतकी आहे. सध्या 15 टक्के कस्टम ड्युटी म्हणजेच 10,126 रुपये आयात शुल्क लावण्यात येते. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केल्यामुळे या 62 हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर 10 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे 5000/- रुपयांनी स्वस्त होणार आहेत. union budget 2024
असेच गणित चांदीच्या दागिन्यांबद्दल किंवा चांदीच्या वस्तूंच्या खरेदीबद्दल सांगायचे झाले तर आज एक किलो चांदीची किंमत 88,983 रुपये इतकी आहे. यावर देखील 15% कस्टम ड्युटीनुसार 12000/- रुपये कर आकारला जातो. आता 6% कस्टम ड्युटी जोडल्यास ते सुमारे 7000 रुपयांनी स्वस्त होईल. 15.4% आयात शुल्कासह 10 प्लॅटिनमची किंमत आज 25,520 रुपये आहे, जी आजच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सुमारे 2000 रुपयांनी स्वस्त होईल. union budget 2024