केंद्र सरकारमार्फत देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. 1 डिसेंबर 2018 पासून या योजनेस सुरुवात झाली असून. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना हप्त्या हप्त्याने 6000 रुपये देते आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 16 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असून आता लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. फक्त लाभार्थ्यांनी पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी ई-केवायची पूर्ण करणे आवश्यक आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana
Table of Contents
तुमच्या बँकेत 17 वा हप्त येण्याआधी करा ई-केवायसी
· ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी पडताळणी केलेली नाही त्यांनी आजच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच pmkisan.gov.in या लिंकवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. कारण त्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा लाभार्थ्यांना योजनेचा 17 वा हप्ता मिळणार नाही.
· तसेच शेतकऱ्यांनी अर्जात नमूद केलेल्या जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी असे न केल्यास 17 वा हप्ता अडकू शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करावी.
· शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana
कधी जमा होणार PM किसानचा 17 वा हप्ता?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षभरात 6000 रुपये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. PM Kisan Samman Nidhi Yojana