मंहिंद्राच्या सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची प्रतितास 100 रुपये होतेय बचत, जाणून घ्या | Mahindra CNG Tractor
शेती म्हटलं की कष्ट आलंच. ‘शेती करायची म्हणजे खायचं काम नाही गड्या’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकल असेल. पूर्वी शेतीची (Agriculture ) मशागत करण्यासाठी बैल अन् औतांचा वापर केला जात होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागत असे. शेतकऱ्यांना घाम गाळावा लागत असायचा, पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांची ही कामे सोपी होण्यासाठी विविध यंत्राचा शोध लावला. आता मशागतीसाठी शेतकरी ट्रॅक्टरचा (Mahindra CNG Tractor) वापर करत आहेत. ट्रॅक्टरचा वापर करायला लागले खरे पण पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मग कष्ट कमी झालं खर पण त्याबदल्यात पेट्रोल-डिझेलसाठी पैसा जाऊ लागला. म्हणून शेतकऱ्यांसाठी बाजारात महिंद्राने सीएनजी ट्रॅक्टर आणले. आता महिंद्रा कंपनीच्या याच सीएनजी ट्रॅक्टरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिंद्रा ट्रॅक्टर हा जवळपास गेल्या चार दशकांपासून भारताचा नंबर वन ब्रँड आहे. जो जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक आहे. महिंद्रा कंपनीने 1963 मध्ये इंटरनॅशनल हार्वेस्टर, इंक., यूएसए सह संयुक्त उपक्रमाद्वारे आपला पहिला ट्रॅक्टर आणला होता. जो मार्च 2019 मध्ये जागतिक विक्रीसह तीस लाख ट्रॅक्टर विकणारा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रँड बनला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो महिंद्रा कंपनीचा सीएनजी ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर इतकाच जलद व शक्तीने चालतो.
सीएनजी इंधनावरील ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार
देशातील आघाडीचा महिंद्रा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर आणला आहे. आत्तापर्यंत अनेक ट्रॅक्टर डिझेल इंजिनवर चालत होते. पण आता सीएनजी इंधनावर ट्रॅक्टर चालवल्यास शेतकऱ्यांची मोठी बचत होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे सीएनजीवर ट्रॅक्टर चालवल्यास डिझेलच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी खर्च येईल. महिंद्राच्या CNG ट्रॅक्टरमध्ये 45 लिटर क्षमतेच्या चार टाक्या किंवा 200-बारच्या दाबावर 24 किलो गॅस भरून ठेवण्याची क्षमता आहे. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत प्रति तास 100 रुपयांची बचत सीएनजी ट्रॅक्टरमुळे होते. या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी होण्यास मोठी मदत देखील होणार आहे.
CNG ट्रॅक्टरमुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल
महिंद्राचा हा CNG ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत जवळपास 70% उत्सर्जन कमी करतो. तसेच इंजिन कंपन कमी झाल्यामुळे आवाजाची पातळी कमी करण्यात आली आहे. जो डिझेल ट्रॅक्टरपेक्षा 3.5dB कमी आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. या तांत्रिक सुधारणामुळे केवळ जास्त कामाचे तास व जास्त इंजिन टिकाऊपणा मिळतोच, तर कृषी व बिगर कृषी अनुप्रयोगांसाठी ऑपरेटरच्या आरामात देखील सुधारणा होते. महिंद्राने या ट्रॅक्टरमध्ये उत्कृष्ट उत्सर्जन नियंत्रण, कार्यप्रदर्शन व ऑपरेटिंग खर्च कार्यक्षमता याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सीएनजी-चालित वाहने विकसित करण्यात आपल्या व्यापक कौशल्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या फायद्याचा हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी विकत घेतला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होईल तसेच पर्यावरणाचे संरक्षण देखील होईल.
Post Comment