देशातील प्रत्येक नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. महिलांसाठी देखील सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने दिव्यांग लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांच्यासाठी एक योजना सुरू केली आहे. तसेच दिव्यांकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारने 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जे 40% ते 80% पर्यंत दिव्यांग व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना दर महिन्याला 1000 ते 3000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे आर्थिक सहाय्य 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी जवळपास 60 हजार दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकल्पना मांडली असून, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबवली जात आहे. दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या पात्रता, अटी, शर्ती, निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन https://portal.mcgm.gov.in ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना किती मिळणार पैसे?
40 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना महिन्याला 1 हजार रुपये अशा हिशोबाने सहा महिन्याचे 6 हजार रुपये एकत्रितपणे देण्यात येणार आहेत. म्हणजेच वर्षाला त्यांना बारा हजार रुपये मिळतील. तर दुसरीकडे जे 80 टक्के दिव्यांग असतील अशा व्यक्तींना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत. महिन्याला 3000 म्हटलं तर या व्यक्तींना सहा महिन्याचे 18 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 36 हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत.