फादर्स डे च्या शुभेच्छा! Father’s Day Message in Marathi | Happy Father’s Day

‘फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा
फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा

1 जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर हसत हसत मात करायला शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

2 दिवसभर कष्ट करुन रात्री हसतमुखाने घरात प्रवेश करणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

3 तुम्ही आहात म्हणून माझं जगणं सुंदर आहे,

तुम्ही आहात म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे,

तुम्ही आहात म्हणून मी माझ्या ध्येयाशी बांधलेला आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तुमच्या डोळ्यांतील स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी प्रत्येक क्षण आत्मविश्वासाने जगत आहे.

माझ्या प्रिय वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

4 आपल्या कुटुंबात कोणतेही संकट आहे तरी निधड्या छातीने पुढे सरसावणारी व्यक्ती म्हणजे बाबा; आजच्या या ‘फादर्स डे’च्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!

5 अर्ध्या भरलेल्या खिशाने आमची सगळी स्वप्ने पूर्ण करणाऱ्या आमच्या प्रिय बाबांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

6 तुम्ही ओरडलात, रागावलात, चिडलात पण आम्हाला हवं ते सगळं प्रेमाने आणून देत राहिलात. तुमच्या या अदृष्य आणि निखळ प्रेमाला सलाम. बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

7 स्वतःचा त्रास लपवून चेहऱ्यावर आनंद मिरवणारा एक बाप मुलांना उमगतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या कष्टाचे चीज होते,

आज आम्ही जाणतो तुमच्या प्रेमाला आणि तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाला, तुमच्यामुळेच तर आज आम्ही आयुष्यात यशस्वी आहोत, माझ्या लाडक्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

8 एकत्र कुटुंबाचा डोलारा सांभाळणारे माझे बाबा नकळत आम्हाला नात्यांना जपायला शिकवत राहिले, बाबा तुमच्या या संस्कारांसाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

9 माणसांना ओळखण्याची कला शिकवणाऱ्या माझ्या वडिलांनी जगणं सोपं केलं आणि नात्यांना महत्त्व देत कुटुंबाला बांधून ठेवण्याची शिस्त आम्हाला लावली अशा माझ्या प्रिय वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

10 बाबा तुमच्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर सोबत राहील, पण तुमच्या सोबत असण्याने आयुष्याला किंमत राहील. ईश्वर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी आयुष्य देवो, माझ्या प्रिय बाबांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

11 कितीही अडचणी आल्या आणि कितीही संकटे आली तरी बाबांचा हात डोक्यावर असेल तर हिंमत मिळते आयुष्य समाधानाने जगण्याची. माझ्या प्रिय बाबांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

12 बाबा माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुमच्यासाठीच आहे, माझं हे संपूर्ण जीवन तुमच्यासाठीच आहे, माझ्या प्रिय बाबांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

13 मी आयुष्यात सेटल व्हावा/व्हावी म्हणून तुम्ही जीवनभर मिळेल ते काम केलात, आज तुमच्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ मिळाला, प्रिय बाबा तुम्ही फक्त आनंदी रहा हिच आजच्या ‘फादर्स डे’ निमित्त ईश्वरचरणी शुभकामना!

Fathers Day Message in Marathi 14
Fathers Day Message in Marathi 14

14 जीवनाच्या वाटेवरील संकटांना तोंड देत प्रामाणिक प्रवास सुरु ठेवण्याचा आदर्श आमच्यासमोर ठेवणाऱ्या माझ्या बाबांना ईश्वर नेहमी निरोगी आणि वेदनामुक्त आयुष्य देवो, हिच आजच्या ‘फादर्स डे’ निमित्त ईश्वरचरणी शुभकामना!

15 नाती जपताना विश्वास आणि प्रामाणिकपणा कायम असावा अशी शिकवण बाबा तुम्ही आम्हाला दिती म्हणूनच तर आज कुटुंबात आणि समाजात माझ्या शब्दाला किंमत आहे. आयुष्य जगण्याचे खरे तत्व माझ्यात रुजवल्याबद्दल बाबा तुमचे मनापासून धन्यवाद, प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

16 प्रत्येक वादळात मौनाने स्थीर राहणारे, कितीही कष्ट पडले तरी हसत हसत झेलणारे बाबा तुमच्यामुळे आमच्या जीवनाचा अर्थ आहे, आम्ही आज जे काही आहोत तुमच्या त्यावेळच्या कष्टामुळेच. प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

17 बाप म्हणजे घरचा स्तंभ कायम ताठ राहून नात्यांना मजबूती देणारा, बाप म्हणजे कुटुंबाच्या प्रत्येक गरजा एक एक करत पुर्ण करणारा, बाबा तुमच्या प्रत्येक कष्टाची आम्हाला जाणीव आहे, प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

18 प्रत्येक मागितलेली वस्तू हातात आणून देत निस्वार्थ प्रेम करणारे माझे वडिल माझ्यासाठी देवाहूनही मोठे आहेत म्हणूनच तर माझं संपूर्ण जगापेक्षा त्यांच्यावरच जास्त प्रेम आहे. प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

19 स्वतःचे दुःख लपवून आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारे प्रिय बाबा तुम्ही कायम माझे प्रेरणास्थान असाल. प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

20 प्रत्येक क्षण आनंदी होतो जेव्हा वडिलांचा डोक्यावर हात असतो. सोबत असेल तर वडिलांची आयुष्याच्या अडचणींवर धिराने आपण मात करतो, म्हणूनच बाबा तुम्हाला अखंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. प्रिय बाबा तुम्हाला ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a comment