इन्स्टंट लोन ॲप्सपासून रहा सावधान! अन्यथा तुमच्यासोबतही होऊ शकतो मोठा धोका 

अनेकदा लोकांना कर्ज घेण्याची प्रचंड गरज पडते. मग ते आजारपणासाठी असते तर कधी काही महत्वाच्या गोष्टीसाठी. तुम्हाला हे आयुष्यात कधीतरी कर्ज घेण्याची वेळ पडलेच असेल किंवा भविष्यात पडेल. बरोबर ना? अशावेळी आपण मोबाईलवर सतत कर्जाबद्दल (Loan) काही ना काही सर्च करत असतो. त्याचवेळी काही असे लोन ॲप्स आहेत जे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला इन्स्टंट लोन (Instant Loan App) देऊ असे मेसेज पाठवतात. तुमच्या व्हॉट्सॲप वर देखील अशा इन्स्टंट लोनचे (Instant Loan) मेसेज येतात. तसेच टेक्स्ट मेसेजही येऊ शकतात. इन्स्टंट लोन तुमच्यासाठी किती घातक ठरू शकते हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

Instant Loan App Savdhan
Instant Loan App Savdhan

इन्स्टंट लोन मिळणारे ॲप्स फायद्याचे असतात का?

तुम्हालाही कोणत्या कामासाठी कर्ज घ्यायचे आहे का? आणि तुम्हीही तात्काळ लोन कुठे मिळेल हे तपासत आहात का? किंवा तुम्ही इन्स्टंट लोन च्या फंद्यात पडत आहात का? असं असेल तर हा लेख आधी वाचाच. कारण तुमच्या कर्जाची गरज पाहता तुमच्या मोबाईल वरील रेकॉर्ड पाहता इन्स्टंट लोन तुमच्याशी तात्काळ संपर्कात साधतील आणि तुम्ही नक्कीच या लोनच्या नादात एका भलत्याच फंद्यात पडाल. होय, हे खरं आहे. कारण इन्स्टंट लोन मिळणारे ॲप्स तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या मोबाईल मधील महत्त्वाचा किंवा पर्सनल डेटा हॅक करू शकतात. कारण झटपट लोन घेण्याच्या नादात आतापर्यंत अनेक जण ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले आहेत.  

इन्स्टंट लोन ॲप्स आणि बँक लोनमध्ये फरक काय?

इन्स्टंट लोन ॲप्स तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची मागणी करत नाही. याउलट तुम्ही जर बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी केलात तर तुमच्याकडून भरमसाठ कागदपत्रांची मागणी केली जाते. या कागदपत्रांची उलट तपासणी करून तसेच तुमचा सिबल स्कोअर चेक करून तुमचे मागील रेकॉर्ड तपासून तुम्हाला कर्ज दिले जाते. मात्र इन्स्टंट लोन ॲप तुमच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची मागणी करत नाही. तसेच तुमचा मागील रेकॉर्ड ही तपासत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही एखादं इन्स्टंट लोन ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करता त्यावेळी सुरुवातीला येणारे मेसेज त्यांना तुम्ही परवानगी देता. ॲप डाऊनलोड केल्यानंतर जे इन्स्ट्रक्शन येतात त्यामध्ये तुमच्या मोबाईल मधील पर्सनल डाटा ते वापरू शकतात किंवा पाहू शकतात असेही येतात. अशा इन्स्ट्रक्शनला तुम्ही Allow करता आणि तिथेच इन्स्टंट लोनच्या जाळ्यात तुम्ही फसता.   

इन्स्टंट लोन ॲप्लिकेशनबद्दल कोणती काळजी घ्यावी?

सर्वात प्रथम कोणतही इन्स्टंट लोन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी त्या ॲप्लिकेशनची सत्यता पूर्णपणे तपासा. त्यानंतरच इन्स्टंट लोनचे एप्लीकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. त्याचबरोबर तुम्हाला संशय येईल अशा कोणत्याही लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. तसेच तुमचा पर्सनल डेटा चोरणारे कोणतेही इन्स्टंट लोन ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका. जेव्हा इन्स्टंट लोन ॲप तुमच्याकडे माहिती मागते त्यावेळी तुम्ही तुमची महत्त्वाची किंवा पर्सनल माहिती देऊ नका. त्याचबरोबर एप्लीकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमधील परवानगी देणारे सेटिंग्स तपासा. 

इन्स्टंट लोन घेऊन कोणता धोका उद्भवतो?

सुरुवातीला इन्स्टंट लोन कडून तुम्हाला चार ते पाच हजार रुपये लोन दिले जाते. अशावेळी तुम्हाला व्याजदरही अतिशय कमी सांगितले जातात. परंतु तुमच्या मोबाईल मधील पर्सनल डेटा चोरून ते तुम्हाला ब्लॅकमेल करू लागतात. तुमच्या मोबाईल मधील पर्सनल फोटो आणि तुमच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना धमक्यांचे कॉल करतात. अशावेळी भीतीपोटी घाबरून कर्ज घेणारा व्यक्ती त्यांच्या सर्व अटी मानण्यास तयार होतो. अशाच ओनालिन पद्धतीने तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जातो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top