आज आपण 20व्या शतकात जगत आहोत. संपूर्ण जग आज मॉडर्न दिसत आहे. परंतु आजही महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत जे गुप्तता पाळली जाते ती कायम आहे. महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत कधीच मन मोकळे प्रमाणाने बोलले जात नाही. दुकानात अंतर्वस्त्र खरेदी करायला गेल्यावर तेथे पुरुष आहे की महिला हे देखील पाहिले जाते. अनेकदा विक्रेता पुरुष असेल तर महिला अंतर्वस्त्राची खरेदी न करतात दुकाना बाहेर येतात. त्याचबरोबर प्रौढ महिला देखील अंतर्वस्त्राबाबत एकमेकींचे मनमोकळेपणाने बोलत नाही. मग विचार करा एक 13 वर्षीय मुलगी जर पुढे जाऊन महिलांच्या अंतर्वस्त्राची कंपनी सुरू करण्याच्या विचार करत असेल तर तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल?
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, लहान एक तेरा वर्षाची मुलगी भविष्यात अंतर्वस्त्राची कंपनी सुरू करण्याचा विचार तिच्या पालकांसमोर मांडते. त्यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर प्रश्नांची यादी तयार केली. या मुलीचं नाव आहे रे रिचा कर. जी आज झीवामी कंपनीची मालकीण आहे. आज आम्ही तुम्हाला तिने घरच्यांचा विरोध पत्करून कशी ही कंपनी सुरू केली याबद्दलची माहिती देणार आहोत.
रिचने घरच्यांना अंतर्वस्थांच्या कंपनीबद्दल विचारले असता तिला घरच्यांनी अनेक प्रश्न विचारले. ते म्हणाले की, आम्हाला जर कोणी विचारले तुमची मुलगी काय करते तर आम्ही काय उत्तर देऊ? आमची मुलगी ब्रा आणि पँटी विकते असं सांगू? इतकच नाही तर रिचाच्या आजूबाजूचे लोक देखील तिची थट्टा उडवायचे. मात्र रिचाने हिम्मत न हारता तिचे स्वप्न सत्यात उतरले. रिचाला ही कंपनी सुरू करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे.
रिचाने बीटीएस पिलानी येथून पदवी प्राप्त केली, यानंतर ती बंगळुरू येथे नोकरी करू लागली. तेथे काम करताना तिच्या मनात अंतर्वस्त्रची कंपनी सुरू करण्याची कल्पना मनात आली. महिला अंतर्वस्त्रांची खरेदी करताना लाजतात हे तिच्या लक्षात आले आणि तिने हाच प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेतला.
तिने या व्यवसायाबद्दल घरी सांगितले असता घरच्यांनीही तिला नकार दिला. तरीही तिने न डगमगता घरच्यांना मनवून, घरच्यांच्या आणि मित्रांच्या मदतीने तब्बल 35 लाख रुपये जमा केले. यानंतर तिने 2011 मध्ये zivame.com ही कंपनी सुरू केली.
केवळ तीन वर्षात तिच्या या कंपनीची खूप प्रगती झाली आणि ती आज कोट्यावधींची मालकीण आहे. रिचाच्या झिवामी कंपनीची एकूण संपत्ती तब्बल 750 कोटी रुपये इतकी आहे.
तिचीही कंपनी ऑनलाईन ऑर्डर्स देखील स्वीकारते. त्या वेबसाईटवर 5 हजारांहून अधिक पॅटर्न उपलब्ध आहेत. इतकच नाही तर रिचाचा 2014 मध्ये फॉर्च्यून इंडियाच्या 40 यादीत या कंपनीमुळे समावेश करण्यात आला आहे. घरच्यांचा विरोध पत्करून तिनेही कंपनी सुरू केली पण त्याचे चीज झाले.