Renault Kwid : 3 लाख रुपये देऊन घरी आणा ही जबरदस्त देणारी मायलेज कार; EMIअसेल 4 हजारांपेक्षाही कमी

Renault Kwid Finance: Renault ही कंपनी सर्वोत्तम गाड्या बनवण्याच्या स्पर्धेत पुढे आहे. तसेच Renault Kwid ही या कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी कार मानली आहे. तुम्हाला माहिती आहे का, 3 लाख रुपये डाऊनपेमेंट करून तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यासाठी वाहन खरेदीदारांना बँकेकडून 7 वर्षांसाठी  वाहनकर्ज देखील सहज मिळेल.  चला तर मग जाणून घेऊ या गाडीचे फायनान्स डिटेल्स..

renault kwid
renault kwid

Renault कंपनीची सर्वात स्वस्त कार

Kwid ही Renault कंपनीची सर्वात स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये जास्त मायलेज देणारी परंतु स्वस्त असणाऱ्या कार्सची वाहनांना खूप मागणी आहे. वाहन खरेदी करणाऱ्यांना कमी किमतीत हाय फीचर्स आणि मायलेज असलेल्या कार अधिक आवडतात. म्हणूनच  Renault Kwid सारख्या कारची निर्मिती केली आहे. ही कार तुम्ही फक्त 3 लाख रुपये डाऊनपेमेंट करून खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ ही कार खरेदीनंतर तुम्हाला किती EMI भरावा लागेल.

रेनॉल्ट क्विड कार खरेदीचे आर्थिक नियोजन

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की Renault Kwid 1.0 RXE व्हेरिएंटची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 4.96 लाख रुपये आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो की, आरटीओ आणि टॅक्सटची रक्कम जोडल्यानंतर ऑन रोड  या कारची किंमत 5.24 लाख रुपये इतकी होईल.  अशा परिस्थितीत आता जर तुम्ही या कारसाठी 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून केवळ 2.24 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे.

वाहन कर्ज कसे मिळवावे?

तुमचे सॅलरी अकाऊंट असलेल्या किंवा बचत खाते असलेल्या कोणत्याही बँकेत तुम्हाला सहज 7  वर्षांसाठी  वाहन कर्ज मिळू शकेल. हल्ली सगळ्यात बँका वाहन कर्जावर  9.5 टक्के व्याज आकारतात, त्यामुळे  7 वर्षांच्या वाहनकर्ज घेतल्यास तुम्हाला फक्त  3661 रुपयांचा EMI दर महिना भरावा लागणार आहे.  असे केल्याने तुम्ही बँकेला एकूण 83 हजार रुपयांपर्यंत व्याज द्यावे लागेल.

रेनॉल्ट क्विड कारची वैशिष्ट्ये

कंपनीने Renault Kwid 1.0 RXE व्हेरिएंट 999 cc इंजिन दिले आहे. या कारचे इंजिन 67 bhp च्या कमाल पॉवरसह 9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार 1 लिटर पेट्रोलमध्ये 21 किमी मायलेज देते. आणि या कारमध्ये  28 लीटर पेट्रोलची इंधन टाकी आहे, जी लाँग ड्राईव्हवर जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Renault Kwid कारमध्ये पॉवर स्टिअरिंग, टॅकोमीटर,  लेन चेंज इंडिकेटर, रिअर स्पॉयलर, LED DRL, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ब्रेक असिस्ट, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्जसह ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांनी अपग्रेड असलेली Renault Kwid ही कार मारुती सुझुकी अल्टो K10 ला थेट टक्कर देते.

प्रवाशांची सुरक्षा

प्रवाशांच्या सेफ्टीसाठी Renault Kwid या करामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखे फीचर्स यामध्ये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top