BSNL देत आहे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मोबाईल नंबर; तुम्ही तुमच्या पसंतीचा नंबर मिळवला का?

BSNL preferred mobile number:- BSNL टेलिकॉम आता तुम्हाला ईतर टेलिकॉम ऑपरेटर प्रमाणे तुमच्या पसंतीने मोबाईल नंबर निवडण्याची सुविधा देते. जर तुम्हालाही तुमच्या BSNL सिम मध्ये आवडीचा नंबर हवा असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकाल? यासंबंधी अधिक माहिती घेऊया.

bsnl favourite number
bsnl favourite number

BSNL कंपनीकडे ग्राहक आले धाऊन

भारतातील प्रमुख खाजगी टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर्स जसे की एअरटेल, जिओ आणि व्हीआय यांनी नुकत्याच आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये १५-२५ टक्क्यांची वाढ केली त्यामुळे अनेक ग्राहकांनी ह्या नेटवर्क ला पर्याय म्हणून आपला कल हा BSNL कडे वळवला असल्याचे आपलयाला दिसून येते.

ह्याशिवाय BSNL ने आपल्या भूतकाळातील काही त्रुटींवर काम करत देशभरात आपली 4G सेवा विस्तारित केली असून देशभरातील १००० पेक्षा अधिक शहरांमध्ये आता BSNL 4G सेवा उपलब्ध आहे.

तसेच बीएसएनएल ने नुकतेच आपले 5G नेटवर्क टेस्टिंग यशस्वीरीत्या पार पाडले असून भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये बीएसएनएल ची 5G सुविधा देखील लवकरच ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.

अशातच तुम्हीसुद्धा जर बीएसएनएलचे सिम विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला तुमच्या पसंतीचा क्रमांक हवा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

बीएसएनएल आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे, अगदी तुम्हाला हवा असेल असा मोबाईल नंबर निवडण्याची सुविधा देते. तुम्हालाही तुमच्या आवडीचा मोबाईल नंबर हवा असल्यास तो तुम्ही कसा मिळवू शकता? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

BSNL मध्ये तुमच्या आवडीचा नंबर कसा निवडाल?

स्टेप १:- गुगलवर अथवा कोणत्याही सर्च इंजिनवर जाऊन “BSNL choose your mobile number” सर्च करा.

स्टेप २:- ‘cymn’ लिंक वर क्लिक करा.

स्टेप ३:- तुमचे राज्य आपल्या देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्यापैकी कोणत्या झोन मध्ये येते तो झोन तसेच तुमच्या राज्याचे नाव निवडा.

स्टेप ४:- BSNL आपल्या ग्राहकांना त्यांना हवे असलेले, आवडीचे नंबर हे मोबाईल नंबरच्या सुरवातीला, मध्यभागी अथवा शेवटी कुठे हवे आहे ह्याचा पर्याय देते. यामध्ये ग्राहक आवडती मालिका (series), जन्म दिनांक, विशिष्ठ संख्यांची बेरीज, आवडीच्या अंकाची बेरीज आणि फॅन्सी नंबर निवडू शकतात.

स्टेप ५:- तुमच्या पसंतीचा नंबर निवडून झाल्यावर “नंबर राखीव करा” ह्या टॅबवर क्लिक करा.

स्टेप ६:- नंबर राखीव करण्यासाठी तुम्हाला OTP विचारला जाईल ज्यासाठी सध्या वापरात असलेला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ठ करुन त्यावर OTP मिळवून तो नमूद करा.

स्टेप ७:- तुमचा नंबर कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पसंतीच्या नंबरचे BSNL सिम मिळवण्यासाठी तुमच्या नजीकच्या BSNL कार्यालयात भेट द्यावी लागेल.

Leave a comment