पावसाबाबत हवामान विभागाने अपडेट जारी केले आहे. राज्यामध्ये मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहे. ज्यामुळे आता राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Maharashtra Weather Update)
बंगालच्या उपसागरामध्ये आता कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचमुळे राज्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. हीच परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून कोकण, मराठवाडा, घाटमाथ्यावरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, अमरावती, नांदेड, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात मुसळधार पावसाने शनिवारी 19 जुलै रोजी हजेरी लावली.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी?
हवामान विभागाने रत्नागिरी, गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी?
मुंबई, पालघर, अकोला, वाशीम, यवतमाळ, पुणे, कोल्हापूर, आणि बुलडाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा?
त्याचबरोबर हवामान विभागाकडून धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विजांपासून आपले संरक्षण करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.