बाजारात टोमॅटोची लिलाव वाढली! बाजारात कापूस सोयाबीनचे दर नरमले, पाहा शेतमालाचे ताजे बाजारभाव | Market Rate

शेतकऱ्यांना नियमितपणे शेतमालाचे ताजे बाजारभाव समजले तर त्यांची फसवणुक न होता योग्य भावात आपला शेतमाल विकणे शक्य होते. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे ताजे बाजार भाव सांगणार आहोत. आज बाजारात शेतमालाल किती भाव मिळाला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Farmer Market Rate
Farmer Market Rate

कापूस

तर शेतकरी मित्रांनो बाजारात कापसाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून नरमले आहेत. बाजारात जून महिन्यात कापसाची आवक देखील कमी झाली. तरी देखील कापसाच्या दरात नरमाई दिसून येत आहे. बाजारात आवक कमी असून देखील कापसाचे दर 7 हजार 100 ते 7 हजार 500 रुपयांच्या दरम्यानच राहीला आहे. 

सोयाबिन

कापसाप्रमाणे बाजारात सोयाबीनची देखील आवक कमी झाली आहे. दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा काहीसा स्टॉक मागे दाबून ठेवला आहे. परंतु देशात होणारी खाद्यतेलाची आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असलेला दराचा दबाव कायम असल्यामुळे सोयाबीनचे दर दबावातच आहेत. देशातील बाजारपेठेत सोयाबीनला 4 हजार 100 ते 4 हजार 500 रुपयांच्या दर मिळत आहे. दराची ही स्थिती आणखी दिवस अशीच राहू शकते, असा अंदाज आहे.  

टोमॅटो 

बाजारात टोमॅटोची लाली चांगलीच वाढली आहे. बाजारात टोमॅटोची आवक घटल्यामुळे दराला चांगलाच उठाव मिळत आहे. पावसाचा आणि उन्हाचा फटका थेट टोमॅटोला बसला आणि टोमॅटोची आवकच घटली. टोमॅटोला सध्या 2 हजार 300 ते 2 हजार 800 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

हळद

बाजारात सध्या हळदीचे दर टिकून आहेत. हंगामाच्या आधीपासूनच हळदीला चांगला दर मिळत आहे. यावर्षी हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. परिणामी हळदीची मागणी पाहता हळदीला चांगला दर मिळत आहे. हळदीला सध्या सरासरी 14 हजार ते 18 हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment