City Co Operative Bank License | रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांना फटकारले आहे. RBI ने बँकिंग सांख्यिकी कायदा, 1949 च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यास पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा फटका ग्राहकांना देखील मोठा बसणार आहे. नुकताच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. यामुळे या बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका बसला असेल त्यांच्या पैशांचे काय होणार हा सवाल निर्माण झाला आहे. चला तर मग रिझर्व बँक ऑफ इंडिया ने कोणत्या बँकेचा परवाना (City Co Operative Bank License) रद्द केला आहे आणि बँकेच्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार आहे हे जाणून घेऊयात.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. ज्याचं कारण म्हणजे त्या बँकेचं असणार आर्थिक भविष्य. खरंतर सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एक खाजगी बँक आहे. परंतु या बँकेकडे पैसा शिल्लक नसल्यामुळे या बँकेचे आर्थिक भविष्य अडचणीत असल्यामुळे रिझर्व बँकेने लावला आहे. भविष्यात या बँकेला कसलाच पैसा मिळणार नाही. याचमुळे रिझर्व बँकेने सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना थेट रद्द केला आहे. त्याचबरोबर बँकिंग सांख्यिकी कायदा 1949 याच्या नियमाचे पालन न केल्यामुळे आरबीआय ने हे कठोर पाऊल उचलले आहे.
आरबीआय ने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांचे परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या या कारवाईला 19 जून पासून सुरुवात झाली आहे. नेमकी महाराष्ट्रातील सिटी को-ऑपरेटिव्ह आरबीआयच्या या कारवाईच्या कचाट्यात सापडली आहे. बँकेकडे शिल्लक रक्कम होती तसेच बँकेला पैसे येण्याची ही शक्यता नव्हती म्हणून मुंबईतील या सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या पैशाचं काय होणार?
आरबीआयने जर बँकेला आणखी मुदत दिली असती तर बँकेला ग्राहकांचे पैसे परत करणे शक्य झाले नसते म्हणूनच आरबीआय ने तात्काळ हे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर सध्याही बँक ग्राहकांचे पूर्णपणे पैसे देऊ शकणार नाही. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मुंबईतील सिटी बँक सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांचे निम्मे किंवा त्याहून अधिक पैसे देऊ शकते पण पूर्णपणे पैसे देण्यास बँक असमर्थ असेल असे देखील आरबीआय ने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्णपणे पैसे मिळतील याची चिंता आहे.