नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गुमगाव हे गाव आहे. या गावातून समृद्धी महामार्ग जातो. परंतु येथील शेतकऱ्यांच्या जीवनात अजून काही समृद्धी आलेली नाही. निसर्गचक्रानुसार येथील शेतकरी शेती करतात परंतु पावसाच्या बेभरवशीपणामुळे शेतात नापीकी आणि घरात कर्ज यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातच गुमगावातील एक तरुण दिनेश लोखंडे याने नवा मार्ग निवडला आणि यशस्वीरित्या रेशीम शेती करुन दाखवली. चला तर मग जाणून घेऊया गुमगावच्या दिनेश लोखंडे यांची रेशीम शेती विषयीची यशस्वी गाथा.
अशी मिळाली दिनेशला या व्यवसायाची माहिती
2020 मध्ये कृषी विभागाच्या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये दिनेश लोखंडे यांना रेशीम शेती व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. बुटीबोरी या गावातील संदीप निखाडे हे आधीपासून रेशीम शेती करीत होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी दिनेश लोखंडे त्यांच्या शेतात राबले आणि रेशीम शेतीची वर्षभरात संपुर्ण माहिती मिळवली. आत्मविश्वास मिळाल्यानंतर दिनेश लोखंडे यांनी स्वतः रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. Success story
भरघोस उत्पन्न देणारा रेशीम व्यवसाय
दिनेश लोखंडे यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय पक्का केला आणि. सव्वा एकरात व्ही वन जातीच्या तुतीची लागवड केली. 55 बाय 22 फूट आकारचे किटक संगोपन शेड उभारले. या सर्वासाठी त्यांना दिड लाख इतका खर्च आला. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तीन वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना या व्यवसायात स्थीरता मिळाली आहे. वर्षाला सुमारे 8 बॅचेस घेतले जातात. प्रत्येक बॅच दीडशे अंडीपुंजांचे असते. 10 अंडीपुंजांमगे 80 ते 85 रेशीम कोशांचे उत्पादन होते. अंडीपुजांच्या कोशाचे उत्पादन घेण्यासाठी चाक लावल्यानंतर साधारण 20 दिवसांचा कालावधी लागतो. अशा वर्षाला 8 बॅचेस दिनेश लोखंडे घेतात. यामध्ये वर्षाकाठी 3 ते 4 लाखांचे उत्पन्न सहज मिळवता येते. Success story
दिनेश लोखंडे यांची रेशीम शेती ठरली गावासाठी प्रेरणा
दिनेश लोखंडे या ग्रामिण तरुणाने यशस्वी रित्या रेशीम शेती करुन उत्तम पद्धतीने हा व्यवसाय उभा केला आहे. त्यामुळे कर्जात बुडालेल्या गावाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे. दिनेश प्रमाणे रेशीम शेती करण्याचा किंवा तत्सम काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याचा तेथील शेतकरी तरुण विचार करु लागले आहेत. सध्या रेशीम शेती केल्यास रेशीमला बाजारात किलोमागे 700 ते 800 रुपये दर मिळतो. या व्यवसायातून महिन्याकाठी 70 ते 80 हजारापर्यंत उत्पादन घेता येते. Success story
रेशीम शेतीसाठी शासनाची मदत
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती कमी करुन रेशीम शेती सारख्या जोड व्यवसायाकडे वळावे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने रेशीम संचालनालय देखील स्थापन केले आहे. https://mahasilk.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही या संचालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळवू शकता आणि तुम्ही स्वतः देखील रेशीम शेती सुरु करु शकता. Success story