महाराष्ट्रातील ‘या’ प्रवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण शासनाने केले मोफत;  येथे पहा शासन निर्णय

महाराष्ट्र शासन नेहमीच मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विविध योजना आखत आले आहे. आता मात्र महाराष्ट्र शासनाने आरक्षित प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना उच्च शिक्षण घेताना येणारा खर्च आता महाराष्ट्र शासन उचलणार आहे. त्यामुळे मुलींची आर्थिक जबाबदारी आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील महाराष्ट्र शासन घेत आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेबाबत आपण सविस्तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Free Education for Girls Maharashtra
Free Education for Girls Maharashtra

असा आहे शासन निर्णय

व्यावसाय अभ्यासक्रम व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागासवगब (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के  एवजी 100 टक्के लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. असा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने 8 जुलै 2024 रोजी जाहीर केला.

मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेचे उद्दिष्ट

प्रत्येक मुलीला तिच्या इच्छेनुसार शिकण्याचा अधिकार आहे. परंतु यामध्ये आर्थिक अडचणी येत असल्यास शासन त्या ठराविक प्रवर्गातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेईल. त्यामुळे असे होईल की मुलींनी जेवढे शिकायची  इच्छा आहे तोपर्यंत शिक्षण घेता येईल.  मुलींना मोफत शिक्षण देण्यामागचा महाराष्ट्र शासनाचा हाच उद्देश आहे.

मुलगी उच्चशिक्षित झाल्यास समाजाचा दृष्टिकोन बदलणार

आर्थिक अडचणींमुळे ज्या मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मुलगी उच्च शिक्षित असेल, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असेल तर समाजाचा देखील त्या मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागासवगब (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवगातील मुलींना उच्च शिक्षण मोफत करुन शासनाने एक क्रंतिकारी निर्णय घेतला आहे.

मोफत शिक्षण योजनेसाठी पात्रता

·      योजनेचा लाक्ष घेणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागासवगब (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींनाच होणार आहे

·      लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

·      मुलगी शिक्षण घेत असल्याचे पुरावे असणे गरजेचे आहे

·       चालू वर्षाचे शिक्षण बोनाफाईड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

मोफत शिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

·      आधार कार्ड

·      रहिवासी दाखला

·      बँक पासबुक खाते

·      उत्पन्नाचा दाखला

·      पासपोर्ट आकाराचा फोटो

·      बोनाफाईड सर्टिफिकेट

·      गुणपत्रक

·      T.C. शाळा सोडल्याचा दाखला

·      डोमासाइल सर्टिफिकेट

महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या ज्या मुली वरील पात्रतेत बसत असतील त्यांनी लवकरात लवकर उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यास हरकत नाही. त्यांना या योजनेचा लाक्ष नक्कीच मिळेल आणि ज्या उद्देशाने ही योजना तायर करण्यात आली आहे तो उद्देश सफल होईल. free education for girls 2024 in Maharashtra GR pdf

Link – https://drive.google.com/file/d/1VjrE2QxKuxIyxn-pggLkqGnc-J5Ue7BL/view

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला शासन निर्णय तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top