SBI FD: एसबीआय बँकेच्या ‘या’ चार एफडी योजना ग्राहकांना करतात मालामाल! पाहा कोणत्या एफडी योजनेवर मिळतय सर्वाधिक व्याज? 

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. एसबीआय बँकेत खाते असणे म्हणजे खूप फायद्याची गोष्ट आहे. कारण एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या योजनांद्वारे ग्राहकांचे पैसे दुप्पट होण्यास मदत होते. त्याचमुळे देशातील अनेक नागरिक एसबीआय बँकेलाच पसंती देतात. अनेक लोकांना असे वाटते की आपण एफडीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकत नाही. परंतु ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. एसबीआय बँकेच्या अशा काही एफडी योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठा निधी कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला एसबीआय बँकेच्या एफडी योजनांबद्दल सांगणार आहोत. या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून पैसे दुप्पट करून प्रचंड नफा कमवू शकता. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

SBI FD
SBI FD

SBI FD अमृत कलश योजना

एसबीआय बँकेने ‘अमृत कलश एफडी योजना’ सुरू केली आहे. एसबीआयच्या एफडी योजनेमध्ये तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीतून तुम्हाला महिन्याला 7.10 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर या योजनेत हमी व्याज देखील उपलब्ध आहे. तसेच तुम्ही त्रैमासिक, मासिक किंवा अर्धवार्षिक व्याज पेमेंटचा असा कोणताही पर्याय निवडू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर मुदतीपूर्वी पैसे काढले तर तुमचे 0.5 ते 1 टक्के व्याज त्यातून कट केले जाते. या योजनेचा परिपक्वता कालावधी हा चारशे दिवसांचा आहे. 

SBI FD WeCare योजना

एसबीआय बँकेची ‘SBI WeCare FD योजना’ ही खूप लोकप्रिय योजना आहे. कारण एसबीआय बँकेच्या या योजनेला उच्च व्याजदर दिले जातात. त्याचबरोबर ज्येष् नागरिकांसाठी देखील या योजनेत अधिकचा व्याजदर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याजदर दिला जातो. या योजनेत एफडी साठी 7.50 टक्के व्याजदर दिला जातो. तसेच या योजनेत गुंतवणूक परिपक्वतेचा कालावधी किमान 5 ते 10 वर्षे इतका आहे.

SBI FD ‘अमृत वृष्टी’ योजना

त्याचबरोबर एसबीआय बँकेच्या एफडी योजनेमध्ये ‘अमृत वृष्टी’ FD योजना देखील आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी 444 दिवसांचा आहे. त्याचबरोबर एसबीआय बँक अमृत दुरुस्ती एफडी योजनेसाठी 7.25% व्याजदर देते. तसेच या योजनेत देखील ज्यष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर दिले जातात. एसबीआयच्या या एफडी योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपये गुंतवू शकता. 

SBI FD सर्वोत्तम योजना

इतर सरकारी बँकांच्या योजनांच्या तुलनेत एसबीआय बँकेचे एसबीआय सर्वोत्तम एफडी योजना फायदेशीर आणि अधिक व्याजदर देणारी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एक ते दोन वर्ष गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच कमी कालावधीमध्ये ग्राहक अधिका अधिक पैसे कमावू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.4% व्याज मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.90% व्याजदर मिळतो. त्यामुळे SBIची ही योजना सर्वाधिक फायदेशीर आहे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment