Tax Saving FD: कर बचत करणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवल्यास किती होईल फायदा? SBI, PNB, Canara बँक आणि पोस्ट ऑफिसमधून किती मिळेल रिटर्न?

आर्थिक नियोजनाबाबत आजकाल सगळीकडेच चर्चा होताना दिसून येते. योग्य ठिकाणी केलेली बचत ही नेहमीच भविष्यातील आर्थिक अडचणींशी लढण्याचे सामर्थ्य देते. म्हणूनच योग्य बचत आणि योग्य गुंतवणूक ही आजच करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी FD म्हणजेच Fixed Deposit हा उत्तम पर्याय ठरतो. विविध बँका आणि वित्तीय संस्था या FD वर उत्तम व्याज देखील देतात. त्यामुळे पैशांची बचत होते आणि उत्तम परतावा देखील आपल्याला मिळतो.  इतकेच नाही तर FD वरील मिळणारे व्याज हे करबचत करणारे असते. म्हणजे त्यावर कोणताही कर लावला जात नाही. Tax Saving FD

FD

FD म्हणजे काय?

FD म्हणजेच Fixed Deposit. व्यक्तीने बँक किंवा वित्तीय संस्थेच ठराविक कालावधीसाठी जमा केलेली रक्कम. ही रक्कम व्यक्ती एकाच वेळी जमा करते आणि 1 ते 5 किंवा मग 10 वर्षांसाठी फिक्स केला जाते. त्यावर ठराविक व्याज मिळते आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम ही मोठी असते. चला तर मग जाणून घेऊ SBI, PNB, Canara बँक आणि पोस्ट ऑफिसमधून FD केल्यास किती रिटर्न मिळतात. Tax Saving FD

SBI मध्ये FD सुरु केल्यास

 SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक असून, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली बँक आहे. SBI मध्ये 5 वर्षांसाठी एफडी केल्यास बचत केलेल्या रकमेवर  6.75%  व्याज मिळते. हेच ज्येष्ठ नागरिकांनी बचत केल्यास त्यांना  5 वर्षांसाठी 7.25%  इतके व्याज मिळते. जर तुम्ही 1,00,000 रुपयांची 5 वर्षांसाठी एफडी केली तर तुम्हाला व्याजाचे पैसे मिळून 1,39,749 रुपये रिटर्न मिळतात. हिच बचत जर ज्येष्ठ नागरिकांनी  केली असेल तर त्यांना 7.25%  इतके व्याज मिळते आणि 1,43,226 रुपये इतकी मॅच्युरिटी रक्कम मिळते. Tax Saving FD

PNB मध्ये FD सुरु केल्यास

 PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक. या बँकेत सर्व सामान्य व्यक्तीने 1,00,000 रुपयांची 5 वर्षांसाठी FD केली असता. 6.50% व्याजा प्रमाणे 1,38,042 रुपये इतकी रक्कम परत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षांसाठी 1 लाखाची FD केली असता 7%  व्याज लावून 1,41,478 रुपये इतकी रक्कम परत मिळते.   आणि  सुपर सीनियर सिटीजंस यांना या बँकेत वेगळा व्याजदर आहे. सुपर सिनियर सिटिजन्स यांनी या बँकेत 5 वर्षांसाठी 1 लाखाची FD केल्यास त्यांना त्यांच्या बचतीवर 7.30% व्याज दिले जाते आणि   1,43,578 रुपये इतकी रक्कम परत मिळते.  Tax Saving FD

कॅनरा बँकमध्ये FD सुरु केल्यास

 कॅनरा बँक मध्ये तुम्ही 5  वर्षांसाठी 1 लाखाची  FD केल्यास  तुम्हाला 6.80% व्याज लावून 1,40,094 रुपये इतकी रक्कम परत मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याज लावून 1,43,578 रुपये रक्कम परत मिळते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

पोस्ट ऑफिसमध्ये FD सुरु केल्यास

भारतीय डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस कार्य करते. पोस्ट ऑफिसच्या FD मध्ये 5 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची बचत केल्यास 7.5% व्याज मिळते. याचा हिशेब केल्यास तुमच्या बचतीवर तुम्हाला  1,44,995 रुपये इतकी मॅच्युरिटी अमाऊंट मिळते. Tax Saving FD

Leave a comment