आता रेशन कार्डात दुरुस्ती करा ऑनलाईन पद्धतीने! रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी आणि नाव कमी करणे | Ration Card Maharashtra

आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्रे असणारे कागदपत्र म्हणजे ‘रेशन कार्ड’. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर विविध योजनांचा लाभ मिळतो. तसेच अनेक ठिकाणी रेशन कार्डची कागदपत्र म्हणून विचारणा केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे खूपच महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या रेशन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागतात. यामुळे तुमचा बराच वेळ जातो. तसेच अधिकारी देखील आज उद्या करत कामे रखडवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती कशी करायची? तसेच नाव जोडणे कशी करायची? याबाबतची सविस्तर माहिती सांगणार आहोत. 

Ration Card
Ration Card Maharashtra

सर्वप्रथम प्रथम आपण महाराष्ट्रात तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन दुरुस्ती कसे करता येईल याबाबतची माहिती जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

महाराष्ट्रात ऑनलाईन रेशन कार्ड दुरुस्ती प्रक्रिया | Ration Card

1. सर्वप्रथम तुम्हाला महाफूड पोर्टल https://mahafood.gov.in/website/marathi/OnlineFPS.aspx  या पोर्टल वर जावे लागेल. 

2. या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला “नागरिक सेवा” या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि “रेशन कार्ड दुरुस्ती” हा पर्याय निवडावा लागेल. 

3. यानंतर तुम्हाला “ऑनलाईन अर्ज” वर क्लिक करावे लागणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

4. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका आणि “सबमिट” वर क्लिक क्लिक करावे लागणार आहे.

5. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आणि दुरुस्ती करायची माहिती निवडावी लागेल. 

6. यानंतर तुम्हाला विचारलेले तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

7. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला “सबमिट” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमचा अर्ज क्रमांक नोंदवा. यासाठी https://www.mahaonline.gov.in/Site/24/Maha-E-Seva-centers  वर जा.

यानंतर “सेवा” वर क्लिक करा आणि “अन्न आणि पुरवठा” निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला “रेशन कार्ड दुरुस्ती” निवडावी लागेल. 

तुमचा आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका आणि “सबमिट” वर क्लिक करावे लागेल.

अशाप्रकारे तुम्ही सरळ साध्या सोप्या ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मधील दुरुस्ती करू शकता.

जाणून घ्या रेशन कार्डवरील मोफत अन्नधान्यासाठी घरबसल्या करा रेशन कार्ड आधारशी लिंक; ‘अशी’ आहे सोपी प्रक्रिया

महाराष्ट्रात रेशन कार्ड नाव नोंदणी प्रक्रिया | Ration Card Maharashtra

आता तुम्हाला जर रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही ऑनलाईन सेवा फॉलो कराव्या लागतील. 

नवविवाहितेचे किंवा नवजात बालकाचे नाव नोंदवायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम 

https://mahafood.gov.in/website/marathi/OnlineFPS.aspx या पोर्टलवर जावे लागेल. 

  • यानंतर “नागरिक सेवा” या पर्यायावर वर क्लिक करावे लागेल आणि “रेशन कार्ड दुरुस्ती” निवडावी लागेल.
  • त्यानंतर “ऑनलाईन अर्ज” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुमचा आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाका आणि “सबमिट” वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आणि दुरुस्ती करा अशी माहिती निवडा.
  • त्यानंतर विचारलेली तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • यानंतर “सबमिट” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक नोंदवा.

जाणून घ्या – बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचंय? तर पाहा आवश्यक कागदपत्रे आणि व्याजदर

2 thoughts on “आता रेशन कार्डात दुरुस्ती करा ऑनलाईन पद्धतीने! रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी आणि नाव कमी करणे | Ration Card Maharashtra”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top