आता लाईट नसताना रात्रभर जळत राहील हा बल्ब; महागडे इन्व्हर्टर घेण्याची गरज नाही

भारतातील सौर ऊर्जेचा पर्याय निर्माण झाला असला तरी आजही अनेक ठिकाणी ग्रीडची विज वापरली जाते. ग्रामिण भागात तर ग्रीडच्या विजेमुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. लोडशेडींगमुळे ग्रामिण भागातील नागरिक नेहमीच त्रस्त असल्याचे दिसून येते. दिवसा सुर्याच्या प्रकाशात काही कामे करता येतात परंतु रात्री प्रकाश नसेल तर मुलांना अभ्यास करणे कठीण होते, गृहिणींना स्वयंपाक करणे कठीण होते. या प्रश्नावर उपाय म्हणून हॅलोनिक्स या कंपनीने रिचार्जेबल LED बल्बची निर्मीती केली आहे. हा बल्ब एकदा चार्ज केल्यानंतर रात्रभर प्रकाश देण्यास सक्षम आहे. चला तर मग या बल्बबद्दल अधिक माहिती मिळवूया. त्याआधी रिचार्जेबल बल्ब तयार करणाऱ्या कंपनीबद्दल अधिक माहिती मिळवूया.

Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb
Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb

हॅलोनिक्स कंपनीची भारतीयांच्या गरजा पूर्ण करणारे उत्पादने

हॅलोनिक्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिकल कंपनी आहे जी किरकोळ आणि संस्थात्मक खरेदीदारांना लायटिंग, पंखे, स्मार्ट IOT उत्पादने पुरवते. ही एक भारतीय कंपनी आहे जी मेक इन इंडिया प्रकल्पाचा देखील भाग आहे. तांत्रिक क्रांतीचे नेतृत्व करत, कंपनी ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश समाधाने सादर करण्यात आघाडीवर आहे. हॅलोनिक्स ही पहिली CFL उत्पादक असून भारतात LED लाइटिंग सोल्यूशन्स सादर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीने तयार केलेला Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb सध्या खूप कामी येत आहे.

लाईट चालू असताना आपोआप चार्ज होतात

हॅलोनिक्स चे रिचार्जेबल एलईडी बल्ब हे लाईट चालू असताना आपोआप चार्ज होतात आणि जेव्हा लाईट नसते तेव्हा प्रकाश देतात. यांना स्मार्ट बल्ब देखील म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बल्ब लवकर फ्यूज होत नाहीत आणि त्यांची प्रकाशाची क्षमता देखील उत्तम असते.

हॅलोनिक्स 9W इन्व्हर्टर रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब : Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb

इन्वर्टर खरेदी करु न शकणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय हॅलोनिक्स 9W इन्व्हर्टर रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब हा उत्तम पर्याय ठरत आहे. काही ग्रामीण भागात आर्थिक अडचणींमुळे तेथील नागरिक सततच्या लोड शेडिंगमुळे त्रस्त असतात परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. अशा भागात हॅलोनिक्स 9W इन्व्हर्टर रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. कारण हा बल्ब विज असताना आपोआप रिचार्ज होतो आणि विज नसताना संपुर्ण घर प्रकाशमान करतो. सध्या बाजारात या बल्बची किंमत क्षमतेप्रमाणे 250 ते 650 पर्यंत आहे. तुम्ही तुमच्या गरजेच्या अंदाचाने बल्बची निवड करु शकता. तुम्ही हे बल्ब कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन खरेदी करु शकता किंवा हार्डवेअरच्या दुकानातून देखील खरेदी करु शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top