बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र शासन देत आहे 7 लाखांचे अनुदान आणि बांबू विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, अर्ज कुठे करायचा जाणून घ्या? | Atal Bamboo Yojana

महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून  7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे पडीक आणि खडकाळ जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

bamboo yojana
Atal Bamboo Yojana

बांबू लागवडीसाठी अनुदान योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया

महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत अटल बांबू समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीचा प्रस्ताव तयार करून ग्राम रोजगार सेवकामार्फत आणि ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याचे संमतीपत्र घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीमधूनच रोपे खरेदी करावी लागणार आहेत. या बांबूच्या रोपांची लागवड 15X15 या अंतराने  करणे गरजेचे आहे. बांबूची लागवड केल्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने हे अनुदान शेतकऱ्यांना 3 वर्षाच्या कालावधीत देण्यात येणार आहे. मुख्यतः शासन देत असलेले अनुदान हे बांबूच्या देखभालीसाठी आहे त्यामुळे तीन वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला आहे.

येथे करा अर्ज

अटल बांबू समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल वेबसाईट भेट द्या. 

https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसाठी अर्ज करु शकता. दिलेला संपूर्ण फ़ॉर्म योग्य पद्धतीने भरावयाचा आहे. Atal Bambu yojana 2024

पडिक जमिनीवर करा बांबूची शेती

राज्यातील विविध जिल्ह्यांचा विचार केला तर तेथे हजारो हेक्टर जमीन पडीक जमीन आहे. या जमिनींचा वापर करुन तेथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बांबूची लागवड केल्यास उत्तम उत्पन्न मिळू शकेल. शासन यासाठी शेतकऱ्यांना 7 लाखापर्यंतचे अनुदान देत आहे. त्यासाठी बाबूंची वाढ जस जशी होईल त्याप्रमाणे दरवर्षी शेतकऱ्यांना बाबूंच्या रोपांच्या देखभालीसाठी ही आर्थिक मदत देता येईल असे शासनाने जाहीर केले आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

शेतकरी त्यांच्या शेतीच्या  बांधावरसुद्धा बांबू लागवड करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची पडीक जमीन सुद्धा लागवडीखाली येत आहे, त्यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे देखील मिळू शकणार आहेत. Atal Bamboo Yojana 2024

बांबूच्या रोपांची लागवड

हेक्टरी सरासरी 1111 बांबू रोपांची लागवड करावी लागणार आहे. बांबूतच्या रोपांच्या लागवडीपासून ते देखभालीपर्यंत 3 वर्षात शेतकऱ्यांना 7 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून  देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी 2.76 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 1.56 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी उर्वरित रक्कम अनुदान देण्यात येणार आहे. बांबू लागवडीसाठी शासन शेतकऱ्यांना चांगले अनुदान देत आहे.

बांबूसाठी मार्केट तयार करुन देणार

बांबूची शेती केल्यानंतर त्याची विक्री नेमकी कुठे करायची हे शेतकऱ्यांना माहिती नसते त्यामुळे त्यासाठी शासनाकडून एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची माहिती देण्यात येईल आणि शेतकऱ्यांसाठी बाबूंची विक्री करण्यासाठी मार्केट देखील तयार करण्यात येणार आहे. Atal Bamboo Yojana 2024

Leave a comment