तर मित्रांनो ही बांधकाम कामगार योजना सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाले यामध्ये 30 विविध भांड्यांचा संच ची वाटप करण्यात येणार आहे. याची किंमत फक्त १ रुपये आहे.
Bandhkam Kamgar Yojana
ही योजना कोणासाठी आहे?
जे लोक “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” या अंतर्गत जे कामगार नोंदणी केलेले आहेत त्यांनाच हे 30 विविध भांड्यांचे किट वाटप केले जात आहे.
कोण कोणत्या ३० वस्तूचा समावेश आहे बांधकाम कामगार योजना 2024 मध्ये ?
४ ताट.
८ वाट्या.
४ पाण्याचे ग्लास.
३ झाकणासह पातेले.
१ मोठा चमचा (भात वाढण्याचा)
१ वरणाची पळी
१ दोन लिटरचा पाण्याचा जग
१ मसाल्याचा डब्बा (यामध्ये सात छोटे छोटे मसाल्याचे डबे)
३ मोठे डबे झाकणासह (१४ इंचाचा एक, १६ इंचाचा एक, १८ इंचाचा एक)
१ भाकरी करण्याचे परात
५ लिटरचा प्रेशर कुकर
१ स्टील कढाई.
१ स्टीलची मोठी टाकी वगराळासह.
या 30 वस्तूंचा संग्रह नोंदणी केलेल्या कामगारांना पुढील दोन वर्षात देण्यात येणार आहे.
जाणून घ्या – ही पोस्ट ऑफिस योजना तुम्हाला दरमहा 9250 रुपये देते
ज्यांना कीट नाही मिळाले त्यांनी काय करायचे?
ज्या लाभार्थ्यांना कीट मिळालेले नाही किंवा त्यांच्या तालुक्याचे नाव नाही, तर त्यांना येणाऱ्या दुसऱ्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना हे कीट मिळणार आहे. कारण ही योजना सलग दोन वर्ष चालू आहे.
नोंदणी कशाप्रकारे करायची?
“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” या अंतर्गत कामगारांनी यांच्या पोर्टल वरती नोंदणी करायचे आहे. या योजने लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 90 दिवसाचे नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे.
Pingback: पशु किसान क्रेडिट कार्ड वर पशुपालकांना मिळते 3 लाखांपर्यंतचे कर्ज, ‘असा’ करा अर्ज | Pashu Kisan Credit Card Scheme
बांधकाम कामगार योजना