तुम्ही केंद्रीय शासनात कर्मचारी असाल किंवा केंद्रांतर्गत असलेल्या कंपन्यांमध्ये काम करीत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. भारत सरकार केंद्रीय तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देत असते. हे वेतन वाढ करताना शासनातर्फे वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे आणि या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसारत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यात येतात. भारतात सर्वांत पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये लागू करण्यात आला होता. यावेळी अनेक केंद्रीय संस्थांच्या शासकीय सेवेत कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची आतुरता आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आज आम्ही घेऊन आलो आहोत. 8th Pay Commission
Table of Contents
सातव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 14 टक्क्यांनी वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2024 पासून वाढ होणार आहे असे सांगण्यात येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सातव्या वेतन आयोगासाठी मागणी केली होती. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर शासकीय सेवेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 14.29% वाढ झाली होती. इतकेच नाही तर त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपयांनी वाढले होते. म्हणूनच आता आठव्या वेतन आयोगातर्फे चांगल्या शिफारशी केल्या जातील, अशी अपेक्षा केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 8th Pay Commission
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
भारतात केंद्र सरकारचे 1 कोटी शासकीय कर्मचारी असून हे सर्व कर्मचारी पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होईल याची आतुरतेने वाट पाहात आहेत. या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत सरकार वेतन आयोगाच्या शिफारशी 2026 मध्ये लागू होणार आहेत. असे सांगण्यात येत आहे. 8th Pay Commission