पोस्टाच्या 2000 ₹, 3000₹ आणि 5000₹ च्या RD वर पहा किती मिळेल व्याज आणि परतावा

post office schemes

पोस्ट ऑफिस हे शासकीय सार्वजनिक क्षेत्राताली संस्था असून या विभागामार्फत पत्रे, शासकीय कागदपत्रे, पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते. तसेच पोस्ट विभागामार्फत बतच योजना देखील राबवल्या जातात. नागरिकांना बचतीची सवय लागावी यासाठी योग्य तो व्याजदर देखील दिला जातो. तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या काही आरडी योजनांची माहिती घेऊन आलो आहोत. कारण पोस्ट RD हा पैसे गुंतवण्याचा उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही जास्त रकमेची गुंतवणूक करु शकत नसाल आणि तुम्हाला दर महिना छोट्या रक्कम गुंतवणूक करायची असल्यास पोस्ट ऑफिसची RD हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

पोस्ट ऑफिसमध्ये 2000 रुपयांची RD केल्यास

पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये तुम्ही महिन्याला 2000/- रुपये गुंतवले तर 5 वर्षांत तुम्ही एकूण 1 लाख 20 हजारांची गुंतवणूक कराल. 6.7 टक्के दराने तुम्हाला त्यावर 22,733 रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 1 लाख 42 हजार 733 इतके पैसे तुमच्या हातात असतील.

पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपयांची RD केल्यास

महिन्याला 3000 रुपये गुंतवल्यास 5 वर्षात एकूण 1 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. यावर 6.7 टक्क्याने व्याजाचे 34,097 रुपये आरडीवर जमा होतील आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात 2 लाख 14 हजार 097 रुपये असतील.

पोस्ट ऑफिसमध्ये 5000 रुपयांची RD केल्यास

महिन्याला 5000 रुपये गुंतवल्यास 5 वर्षात एकूण 3 लाख  रुपयांची गुंतवणूक होईल. यावर 6.7 टक्क्याने व्याजाचे 56,830 रुपये आरडीवर जमा होतील आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात 3 लाख 56 हजार 830 रुपये असतील. अशा पद्धतीने तुम्ही छोट्या रकमेसाठी पोस्ट ऑफिसच्या RD ची निवड करु शकता. Investment Tips Post Office  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top