जीवन विम्याचे फायदे जाणून घ्या; आर्थिक नियोजनाने भविष्य सुरक्षित करा | Life Insurance Policy Benefits

आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात जगण्या मरण्याची शाश्वती उरलेली नाही. त्यामुळे अनेकजण जीवन विम्याचा पर्याय निवडतात. आपल्या नंतर आपल्या कुटुंबियांचे जीवन आर्थिक सुरक्षित रहावे असे प्रत्येक कुटुंब प्रमुखाला वाटत असते. तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी असेल तर तुम्ही आमचा हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि जीवन विम्याचे फायदे समजून घ्या त्यानंतर योग्य आर्थिक नियोजनाला सुरुवात करा.

Life Insurance Benefits
Life Insurance Benefits

जीवन विमा म्हणजे काय?

सर्वप्रथम आपण जीवन विमा म्हणजे काय ते जाणून घेऊ. जीवन विमा म्हणजे व्यक्ती आणि विमा कंपनी  यांच्यातील लिखित पद्धतीने केलेला करार आहे. पॉलिसीधारक विमा कंपनीला ठरल्याप्रमाणे दर महिन्याला, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी पूर्वनिर्धारित रक्कम देतो, ज्याला प्रीमियम असे म्हणतो. आणि त्याबदल्यात विमाकर्ता कंपनी पॉलिसीधारकाला आणि त्याच्या कुटुंबिय लाभार्थ्यांना आर्थिक सुरक्षितता देतात.

जीवन विम्याचे फायदे जाणून घ्या!

तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करायचे असल्यास जीवन विमा पॉलसीबददल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.  हे आहेत जीवन विमा पॉलिसी चे फायदे. benefits of Life Insurance Policy

·      जीवन विमा पॉलिसी काढल्यानंतर आर्थिक सुरक्षा प्राप्त होते.

·      वर्षभरात आपण पॉलिसीमध्ये जेवढी रक्कम भरली आहे त्या तुलनेत वार्षिक करातून लाभ मिळतो.

·      1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, पॉलीसीधारक जीवन विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमवर त्याच्या उत्पन्नातून ₹1.5 लाखांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ घेऊ शकतो.

·      जीवन विम्याचा एक मोठा फायदा म्हणजे जोखीम कमी करणे आणि कव्हरेज.

·      जीवन विम्यामुळे पॉलीसीधारकाचे आणि त्याच्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण होते.

·      कुटुंब प्रमुखाच्या नावे असलेली कर्जे त्याच्या मृत्यूनंतर भरणे कुटुंबियांना शक्य होते.

·      जीवन विम्यामध्ये योग्य आर्थिक परतावा मिळेल याची हमी पॉलीसीधारकाला दिली जाते आणि कंपनीकडून जबाबदारीने आर्थिक परतावा दिला जातो.  

हे आहेत जीवन विम्याचे प्रकार

जीवनातील विविध उद्देशांना पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन करण्याच्या हेतूने जीवन विमा पॉलिसी काढली जाते. जीवन विम्यामध्ये 4 मुख्य पॉलिसी आहेत. Types of Life Insurance Policy

1.   मुदत जीवन विमा

टर्म लाइफ इन्शुरन्समध्ये आर्थिक बचतीसाठी 10, 20 किंवा 30 वर्षे अशा विशिष्ट कालावधीचा निवडला जातो.  पॉलिसीधारकाला निधन झाल्यास, मुदत जीवन विमा लाभार्थ्यांना आर्थिक लाभ  मिळतो. या प्रकारच्या लाइफ इन्शुरन्सचा एक निश्चित कालावधी असल्याने, मुदत संपल्यानंतर मृत्यू लाभ रद्द होतो. तसेच जर पॉलिसीधारकाला टर्म लाइफ इन्शुरन्स चालू ठेवायचे असल्यास प्लॅनचे नूतनीकरण करून आर्थिक संरक्षण सुरू ठेवण्याचा पर्याय देखील कंपनीकडून देण्यात येतो.

2. मनी बॅक पॉलिसी

मनी बॅक पॉलिसीमध्ये संपूर्ण कालावधीत विमा आणि नियमित परतावा दिला जातो. मनी बॅक पॉलिसीसह, प्रीमियम पेमेंट टर्म संपल्यानंतर तुम्हाला परतावा मिळतो. याशिवाय विमान कर्त्याला पॉलिसीची मुदत संपल्यानंतर रोख लाभ आणि बोनस देखील मिळतो.

3. संपूर्ण जीवन विमा

संपूर्ण जीवन विमा हा पॉलिसिधारकाला आजीवन कव्हरेज देतो. संपूर्ण जीवन विम्यामध्ये मॅच्युरिटी लाभ आणि रोख आर्थिक लाभ देखील मिळतो.  ज्यामुळे तुम्हाला तुमची बचत वाढवण्यास मदत होऊ शकते.

४. एंडॉवमेंट पॉलिसी

एंडॉवमेंट पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला सर्व प्रीमियम भरल्यानंतर  शेवटी एकरकमी रक्कम दिली जाते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top