आपण बँकिंग सुविधेचा लाभ घेतो. विविध बँकेच्या योजनांचा देखील लाभ घेतो. अनेकदा बचत खातेदारांना, करंट खातेदारांना विविध सेवा बँकेकडून दिल्या जातात. त्यासाठी बँक ग्राहकांकडून शुल्क घेत असते. परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे तो म्हणजे प्रत्येक ग्राहकांने त्याच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम बाकी ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेची ही किमान शिल्लक रक्कम ग्रामिण आणि शहरी ग्राहकांसाठी वेगवेगळी आहे, चला तर मग जाणून घेऊ तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर तुम्हाली किती पैसे भरावे लागतील. RBI news
स्टेट बँक ऑफ इंडिया
· मोठ्या शहरी भागातील ग्राहकांसाठी 3000/-
· लहान शहरांतील ग्राहकांसाठी 2000/-
· ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी 1000/-
इंड्सइंड बँक
· सामान्य खात्यामध्ये किमान शिल्लक 10000/- रु. असणे आवश्यक आहे.
· क श्रेणीच्या खात्यांमध्ये 5000/- रु. शिल्लक अरणे आवश्यक आहे.
HDFC बँक
· मोठ्या शहरांमधील ग्राहकांच्या बचत खात्यात 10000/- शिल्लक रक्कम असणे अनिवार्य आहे.
· लहान शहरांतील ग्राहकांच्या बचत खात्यात 5000/- शिल्लक रक्कम असणे अनिवार्य आहे.
· ग्रामिण भागातील ग्राहकांच्या बचत खात्यात 2500/- शिल्लक रक्कम असणे अनिवार्य आहे.
पंजाब नॅशनल बँक
· शहरी भागातील ग्राहकांच्या खात्यात 2000/- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
· छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामिण भागातील खात्यांमध्ये 1000 /- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
बँक ऑफ बडोदा
· शहरी भागातील ग्राहकांच्या खात्यात 2000/- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
· छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामिण भागातील खात्यांमध्ये 1000 /- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
बँक ऑफ इंडिया
· शहरी भागातील ग्राहकांच्या खात्यात 2000/- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
· छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामिण भागातील खात्यांमध्ये 1000 /- रु. शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे.
किमान शिल्लक न राखल्यास किती दंड भरावा लागेल?
त्या त्या बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी ठरवून दिलेली शिल्लक रक्कम बचत खात्यात महिना अखेर उरत नसेल तर बँकेकडून त्यासाठी दंड लावला जातो. या दंडाचे शुल्क 500रु. ते 5000 रु. पर्यंत असू शकते. RBI news