स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. संपूर्ण भारतात या बँकेचे 48 कोटींपेक्षाही जास्त ग्राहक या बँकेची सेवा घेत आहेत. अनेक ग्राहक जसे आपली आर्थिक बचत या बँकेत ठेवतात तसेच अनेक ग्राहक बँकेकडून कर्जाची देखील अपेक्षा करतात. कर्जे अनेक प्रकारची असतात त्यापैकी सिबिल स्कोअर कमी असेल तर शैक्षणिक कर्जासाठी यापुढे SBI कोणत्याही ग्राहकाला नाही म्हणून शकणार नाही. याबाबत अधिक माहिती घेऊ आपल्या या लेखाच्या माध्यमातून. SBI loan news
SBI Loan News
चांगला सिबिल स्कोअर आणि वाईट सिबिल स्कोअर कसा ठरतो?
आपण जेव्हा बँकेत किंवा कोणत्याही वित्तिय संस्थेत कर्जासाठी जातो तेव्हा सर्वात आधी आपल्याला तुमचा CIBIL SCORE किती आहे? अशी विचारणा केली जाते. सिबिल स्कोअर हा आपल्या आर्थिक व्यवहारांवरुन ठरत असतो. या आधी आपण घेतलेली कर्जे त्याचे भरलेले EMI आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी परतफेड केलेली कर्जे या सर्वांवरुन आपली CIBIL SCORE ठरत असतो. 450ते700 पर्यंतचा सिबिल स्कोअर हा वाईट स्कोअरमध्ये गणला जातो तर 750 ते 900 पर्यंतचा सिबिल स्कोअर हा चांगल्या सिबिल स्कोअर मध्ये गणला जातो. आणि ज्यांचा सिबिल स्कोअर चांगला आहे त्यांनाच बँक कर्ज देते.
केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
केरळमध्ये एका व्यक्तीने SBI बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला असता वाईट सिबिल स्कोअरमुळे त्या व्यक्तीला शैक्षणिक कर्ज नाकारण्यात आले. याविरोधात त्या व्यक्तीने कोर्टात केस केल्यानंतर उच्च न्यायालयाने SBI ला खडे बोल सुनावले आणि मुलांच्या शिक्षणासाठी या बँकेने कमी सिबिल स्कोअर असला तरी शैक्षणिक कर्जासाठी आडकाठी करु नये, आणि लवकरात लवकर शैक्षणिक कर्ज मंजूर करावे असा निर्णय दिला. SBI loan news
कमी सिबिल स्कोअरमुळे SBI नाकारु शकणार नाही शैक्षणिक कर्ज
एखाद्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर कमी असेल तर यापुढे SBI शैक्षणिक कर्ज नाकारु शकणार नाही. तुम्ही देखील उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊ पाहत असाल आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तरी आता चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही SBI मध्ये जाऊन शैक्षणिक कर्ज मिळवू शकता. उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना ही बातमी नक्की सांगा आणि आमचा हा लेख जरुर शेअर करा. SBI loan news