कोणतेही कर्ज मिळवताना आपण जेव्हा बँकेत किंवा एखाद्या वित्तीय संस्थेत जातो. तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर किती आहे? अनेकदा आपल्याला सिबिल स्कोअर म्हणजे काय हे माहिती नसते. तसेच हा सिबिस स्कोअर कर्ज मिळविण्यासाठी कसा उपयोगी असते ते देखील माहिती नसते. त्यामुळे आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. गृहकर्ज असो किंवा वाहन कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवताना सर्वात आधी कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर तपासला जातो. म्हणूनच आपण सर्वप्रथम CIBIL स्कोअर म्हणजे काय हे जाणून घेऊ.
सिबिल स्कोअर म्हणजे काय?
CIBIL याचा फुल फॉर्म Credit Information Bureau (India) Limited असा होतो. म्हणजे अशी एक संस्था जी प्रत्येक भारतीयाच्या आर्थिक खर्चांवर लक्ष ठेवते आणि या संस्थेला एखाद्या बँक अकाऊंटची हिस्ट्री दिल्यास त्या हिस्ट्रीचा अभ्यास करुन एक अंक जाहीर करते त्याला CIBIL स्कोअर असे म्हणतात. मग हा अंक त्या त्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांवर ठरतो. एखाद्या व्यक्तीने कर्ज घेऊन ते योग्य वेळी परतफेड केली नसेल तर त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर कमी असतो म्हणजे पुन्हा एकदा कर्ज घेताना कोणतीही बँक विचार करेल. परंतु याऊल एखाद्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार सुरळीत असतील. घेतलेल्या लोनचे वेळोवेळी हप्ते भरलेले असतील. एका पेक्षा जास्त कर्जे त्या व्यक्तीवर नसतील तर नक्कीच त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो. अशी व्यक्तीला कोणतीही बँक कर्ज देण्यास त्वरीत तयार होते.
चांगला सिबिल स्कोअर कोणता? Good CIBIL score
https://www.cibil.com/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला तुमचे बँक अकाऊंटची माहिती शेअर करावी लागते. त्याचा अभ्यास करुन या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर दर्शवला जातो. 350 ते 700 च्या दरम्याने सिबिल स्कोअर असल्यास तो चांगला समजला जात नाही. परंतु 700 ते 900 त्या दरम्याने तुमचा सिबिल स्कोअर असेल तर तो अत्यंत चांगला स्कोअर समजला जातो. आणि भारतातील कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन देऊ शकते असा त्याचा अर्थ होतो.