आज-काल मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील फ्लॅट किंवा रुमा भाड्याने देणे हा व्यावसायिक बनला आहे. जातो जागा घेऊन मोठी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत आहे. भाड्याने दिल्यामुळे काहीच न करता मालकाला महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे मालमत्ता आणि उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु तुम्ही आतापर्यंत ऐकलंच असेल की बळजबरीनेही भाडे करू मालकाची मालमत्ता बळकवतात. आज आपण किती वर्षे एकच भाडे करून ठेवला तर ती मालमत्ता त्याच्या नावे होते का याबाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
तसं पाहायला गेलं तर दररोज नवनवीन मालमत्ता वादाची प्रकरणे समोर येत असतात. त्यामुळे आज अशा वादांची कित्येक प्रकरणे न्यायालयात न्यायासाठी प्रलंबित आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाकडून अशाच भाडेकरू मालमत्ता वाद प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून या निकालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कब्जा करणारा भाडेकरू मालमत्तेवर त्याच्या मालकीचा दावा करू शकतो का नाही.
मालमत्तेची काळजी घेणे आवश्यक
सर्वप्रथम आपली मालमत्ता आहे म्हटल्यावर आपणच त्याची व्यवस्थितपणे काळजी घेणे महत्त्वाचे असते. मालमत्ते संदर्भात सर्व नियम आणि कायदे माहित असणे आवश्यक आहे. अन्यथा हलगर्जीपणामुळे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता भाडे करून च्या घशात जाऊ शकते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय भाडेतत्त्वावर देणाऱ्या मालकांसाठी महत्त्वाचा ठरेल. अनेकदा असंही होतं की मालमत्ता खरेदी करून घर मालक परदेशात जातात किंवा त्याकडे कधीच लक्ष देत नाहीत. भाडेकर भाडेतत्त्वावर दिलेला घराची कधीच विचारपूस करत नाही, अशावेळी त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.
भाडेकरूला किती वर्षात मिळतो ताबा?
भारतामध्ये मालमत्तेबाबत आहे असे नियम आहेत की ज्या नियमाद्वारे भाडेकरू काही कालावधीनंतर मालमत्तेवर ताबा मिळवू शकतात. ब्रिटिशांनी बनवलेल्या ‘प्रतिकूल ताबा’ या कायद्यानुसार जर एखादा भाडेकरू सलग 12 वर्षे त्या खोलीमध्ये राहिला असेल तर तो ती मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो. मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी भाडेकरू बारा वर्षे सतत तेथे राहत असल्याचा पुरावा देण्यासाठी प्रॉपर्टी डीड, लाईट बिल, पाणी बिल या गोष्टी न्यायालयासमोर सादर करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बारा वर्षे सलग असलेला भाडेकरू त्या मालमत्तेचा कब्जा मिळवू शकतो. यासाठी घरमालकांनी सतत 11 महिन्यांचा भाड्यातत्त्वाचा करार करावा. यामुळे यामध्ये सातत्य राहणार नाही आणि भाडे करून मालकाच्या मालमत्तेवर ताबा करू शकणार नाही.