आजकाल बँक ही खूप महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आर्थिक व्यवहार करायचा म्हटलं की सामान्य ते प्रतिष्ठित व्यक्तींना बँकेतच जावे लागते. बँक ही आपले पैसे सुरक्षित ठेवते. तसेच त्यावर व्याज देखील देत असते. बँक खात्यांमध्ये देखील वेगळे प्रकार आहेत. एक सेविंग खाते आणि दुसरे करंट खाते असे दोन प्रकार पडतात. आता सर्वसामान्य व्यक्ती म्हटलं की सेविंग खात्यात उघडतात. पण जर तुमचे ही सेविंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण सेविंग खात्याचे काही नियम आहेत. तुम्ही त्याच नियमापर्यंत त्यामध्ये एकदम पैसे जमा करू शकता. कारण सेविंग खात्यामध्ये तुम्ही जर त्या नियमापेक्षा जास्त पैसे भरले तर तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता. चला तर मग बँकेचा नियम काय आहे ते जाणून घेऊयात.
दररोजच्या आयुष्यात बँकेचा व्यवहार हा खूप महत्त्वाचा बनला आहे. व्यापारी उद्योजक यांचे नियमित व्यवहार हे बँकेतच होत असतात. अशावेळी व्यापारी लोक बँकेमध्ये मोठ मोठी रक्कम नियमितपणे भरत असतात. परंतु त्या लोकांचे खाते हे करंट असते. त्यामुळे त्यांना कोणतेही अडचण येत नाही. परंतु ज्यांचे खाते सेविंग आहे त्यांना मात्र काही नियमांचे पालन करावे लागते. तसं पाहायला गेलं तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही एक लागते कोट्यावधीपर्यंत यावर करू शकता. परंतु तुम्हाला बँकेत रोकड जमा करायची असेल तर त्यावर मात्र काही नियम आहेत.
एका दिवसात बँकेत किती रक्कम जमा करता येते?
तुमचे खाते सेविंग असेल आणि तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त रुपये घेऊन बँकेमध्ये जमा करण्यास गेला तर त्यावेळी तुम्हाला बँकेकडून पॅन क्रमांक मागितला जातो. तुम्हाला एका दिवसात केवळ एक लाख रुपये जमा करता येतात. त्याचबरोबर तुम्ही जर नियमितपणे बँक खात्यात पैसे जमा करत नसलं तर तुमच्यासाठी ती मर्यादा 2.50 लाख रुपये असते. त्याचप्रमाणे तुम्ही एका वर्षामध्ये दहा लाख रुपये बँकेत जमा करू शकता. हा नियम आयकर रिटर्न न भरणाऱ्या ग्राहकांना लागू होतो. यापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना आयकर विभागाला त्यासंदर्भात माहिती द्यावी लागते.
…तर आयकर विभागाच्या रडारावर
जर ग्राहक एका आर्थिक वर्षात दहा लाखांहून अधिक रक्कम बँकेमध्ये भरत असतील तर त्यासाठी तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे हे आयकर विभागाला दाखवावे लागते. जर सदर ग्राहक त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत आयकर विभागाला दाखवू शकला नाही तर तो नक्कीच आयकर विभागाच्या रडावर येऊ शकतो. यानंतर त्याच्या विरोधात आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात येते. तसेच त्यावेळी तो दोषी सपडल्यास त्याच्याकडून मोठ्या रकमेचा दंड आकारला जातो.
आयकर विभागाचा नियम
जर तुमचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला 60% कर, 25 टक्के सरचार्ज आणि चार टक्के सेस लागतो. याच कारणामुळे तुम्ही दहा लाखांहून अधिक रक्कम एका आर्थिक वर्षात जमा करू शकत नाही. मात्र तुमच्याकडे आयकर विभागाला दाखवण्यासाठी उत्पन्नाचा स्त्रोत असेल तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नसून, तुम्ही याहून अधिक रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता. परंतु तुम्हाला त्यासाठी आयकर विभागाला कर द्यावा लागेल.