एसबीआयमध्ये झिरो बॅलन्स खाते कसे उघडायचे? जाणून घ्या ग्राहकांना काय मिळतात फायदे? | SBI Zero Balance Account

आयुष्यभरात किंवा दैंनदिन जीवनात जे पैसे कमावतो त्या पैशांची योग्य बचत ठेवण्यासाठी बँक खाते गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक नागरिक बँक खाते काढतात. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही बँक जुनी आहे आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह देखील आहे. तसेच ही बँक आपल्या ग्राहकांना विविध सेवा देखील प्रदान करते. तसेच ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध बँक खाती ऑफर देखील करते. या बँक खात्यांद्वारे ग्राहक आपला मोठा फायदा करून घेऊ शकतात. याच बँक खात्यांपैकी एक असणारे खाते म्हणजे झिरो बॅलन्स खाते (SBI Zero Balance Account) होय. या खात्याचे अनेक फायदे आहेत.

SBI Zero Balance Account
एसबीआय बँकेत झिरो बॅलन्स खाते कसे काढायचे? पाहा काय आहेत फायदे? – 1

तुम्हाला जर एसबीआय बँकेत झिरो बँक बॅलन्स अकाउंट काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. एसबीआय बँकेमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही फॉलो कराव्या लागतील. आज आपण या लेखाद्वारे याबद्दलचीच माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.    

SBI मध्ये झिरो बॅलन्स खाते म्हणजे काय? What is Zero Balance Account in SBI?

सर्वप्रथम एसबीआय झिरो बॅलन्स अकाउंट हे काय आहे हे पाहूया. एसबीआय झिरो बॅलन्स अकाउंट हे बँक खाते साधे आणि सहज प्रवेश करता येणारे खाते आहे. झिरो बॅलन्स अकाउंट खाते उघडल्यानंतर वापरकर्त्यांना किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही त्यांना त्यांच्या सोयीनुसार या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी मुभा देण्यात येते. तसेच इतर बचत खात्यांप्रमाणे, तुम्ही हे खाते झिरो बॅलन्स ठेवून ऑपरेट करू शकता.

SBI द्वारे ऑफर केलेली झिरो बॅलन्स अकाउंट: Zero Balance Account offered by SBI

  • एसबीआय इन्स्टा प्लस बचत बँक खाते
  • मूलभूत बचत बँक ठेव खाते
  • SBI बचत बँक खाते
  • मूलभूत बचत बँक ठेव लहान खाते
  • बचत प्लस खाते
  • अल्पवयीन मुलांसाठी बचत खाते

SBI पात्रता निकष: Eligibility Criteria for Zero Balance Account with SBI

  • वैयक्तिक अर्जदार असावा
  • व्यक्ती एकट्याने किंवा संयुक्तपणे उघडू शकतात
  • अर्जदाराकडे सक्रिय मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे
  • अर्जदार 18 वर्षे आणि त्यावरील असावेत
  • अर्जदारांकडे वैध केवायसी कागदपत्रे असणे आवश्यक आहे
  • अल्पवयीन बचत खाते उघडण्यासाठी अल्पवयीन मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असावे.

SBI मधील झिरो बॅलन्स खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे: Documents Required for Zero Balance Account with SBI 

एक पासपोर्ट आकाराचा फोटो

पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट इ.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

आयडी प्रूफ: पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. 

SBI मध्ये झिरो बॅलन्स खाते कसे उघडायचे? How To open Zero Balance Account in SBI?

स्टेप 1: SBI YONO ॲप डाउनलोड करा.

स्टेप 2: ॲप उघडा आणि ‘बचत खाते उघडा’ वर क्लिक करा. त्यानंतर, ‘शाखेला भेट देऊन’ निवडा. 

स्टेप 3: ‘आता अर्ज करा’ आणि नंतर ‘पुढील’ वर क्लिक करा.

स्टेप 4: तुमच्याकडे आधार कार्ड असताना, ‘ई-केवायसी (बायोमेट्रिक प्रमाणीकरण) वापरून आधारसह उघडा’ पर्याय निवडा. तुमच्याकडे आधार कार्ड नसताना, ‘Open with Officially Valid Document (OVD)’ पर्याय निवडा आणि ‘Next’ वर क्लिक करा.

SBI झिरो बॅलन्स खाते नियम | SBI Zero Balance Account Rules

खातेधारकांनी एसबीआयमध्ये शून्य शिल्लक खाते उघडल्यानंतर त्यांचे दुसरे बचत बँक खाते असू शकत नाही.

तसेच जर ग्राहकाचे दुसरे बचत बँक खाते आधीपासूनच असेल तर ते शून्य शिल्लक खाते उघडल्यानंतर 30 दिवसांच्या ते खाते आत बंद केले जाईल.

SBI खाते वापरकर्ते महिन्यातून 4 वेळा विनामूल्य पैसे काढू शकतात. यामध्ये इतर बँकेच्या एटीएमसह त्याच्या एटीएममधून पैसे काढणे आणि शाखेत पैसे काढणे यांचा समावेश आहे. 

Leave a comment