RBI Changes Credit Score Rule: वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज असो किंवा शैक्षणिक कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कर्ज देणाऱ्या वित्तिय संस्था किंवा बँकांकडून सर्वप्रथम क्रेडिट स्कोर बद्दल विचारणा केली जाते. कोणत्याही बँकेकडून वरीलपैकी कोणतेही कर्ज घेताना क्रेडिट स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांवर ठरत असतो. याच क्रेडिट स्कोर बाबत RBI ने नवीन नियम जाहीर केला आहे, चला तर मग जाणून घेऊ नक्की कोणकोणत्या नियमांत बदल करण्यात आला आहे आणि त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम होणार आहे.
आरबीआयने क्रेडिट स्कोर बाबतचे नियम बदलले
बँकांचे ग्राहक किंवा डिफॉल्टरकडून होणारी बँकांची फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने स्ट्रिक्ट सुचना जाहीर केली आहे. . आरबीआयच्या नवीन नियमांनुसार ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर दर 15 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. असे असताना ग्राहकांना मात्र त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला राखण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार असल्याचे दिसून येते. म्हणजे यापुढे ग्राहक बँकेची फसवणूक करु शकणार नाहीत.
ग्राहकांकडून होते बँकेची फसवणूक
अनेकदा कर्ज घेतल्यानंतर कर्जदार ग्राहकांकडून बँकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे बँकेकडून कर्ज घेऊन ईएमआय न भरल्यास, कर्जाचे वितरण न केल्यास किंवा कर्जाची वेळेत न केल्यास ग्राहकांना महागात पडू शकते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर आणि कोणत्याही प्रकारच्या नवीन कर्जावर होऊ शकतो.RBI Changes Credit Score Rule
क्रेडिट स्कोर बाबत आरबीआयचे नवीन नियम जाणून घ्या
1 जानेवारी 2025 पासून क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी ग्राहकांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही. आरबीआयने नव्या नियमावलीनुसार बँका आणि वित्तीय संस्थांना लवकरात लवकर क्रेडिट स्कोअर अपडेट करण्यास सांगितले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8ऑगस्ट 2024 रोजी हा नवीन नियम जाहीर केला ज्याअंतर्गत क्रेडिट डेटा दर 15 दिवसांनी अपडेट होईल आणि हा डेटा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत किंवा महिन्याच्या अखेरीस किंवा क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CIC) यांनी परस्पर मान्य केलेल्या तारखेनुसार अपडेट केला जाईल असे जाहीर केले.
क्रेडिट स्कोअरबद्दल सध्याचे नियम काय आहेत जाणून घ्या!
सध्याच्या स्थितीनुसार एखाद्या कर्जदाराने ईएमआयवर डिफॉल्ट केले तर क्रेडिट रिपोर्टमध्ये माहिती दिसण्यासाठी 60 दिवस म्हणजे किमान दोन महिने इतका कालावधी लागतो. परंतु नवीन नियमांनुसार जेव्हा कर्ज कंपन्या आणि बँका दर 15 दिवसांनी क्रेडिट माहिती अपडेट करतील, तेव्हा डीफॉल्ट माहिती 30-40 दिवसांच्या आत क्रेडिट अहवालात दिसू लागेल ज्यामुळे वेळेवर पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संपुर्ण आर्थिक माहिती रिपोर्टमध्ये दिसून येईल आणि क्रेडिट स्कोअर सुधारण्याची शक्यता वाढेल.RBI Changes Credit Score Rule