आर्थिक अडचण काही सांगून येत नाही. तर सध्याचे आपले राहणीमानच इतके खर्चिक झाले आहे की पैशांची गरज ही पावला गणिक भासत असते. तुम्हाला जर तुम्हाला स्वतःला पैशांची गरज भासत असेल आणि तुमच्या बचत खात्यात पैसे नसतील तर तुम्हाला कर्ज घेण्याचा विचार करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत अशी माहिती ती तुमचा संभ्रम दूर करेल. कर्ज घेताना पर्सनल लोन घ्यावे की ओव्हरड्राफ्ट. Personal Loan Vs Overdraft
कोणता पर्याय सोयीस्कर ठरेल?
अनेकदा आर्थिक अडचण आहे म्हटल्यावर बँकेचे ग्राहक बँक किंवा NBFC कडून उपलब्ध असलेली वैयक्तिक कर्जे निश्चित व्याजदर आणि स्पष्ट EMI सह येतात. याउलट, बँकांनी ऑफर केलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधा तत्काळ आर्थिक गरजांसाठी सोपा उपाय देतात.
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय आहे? What is overdraft in Marathi
एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पुरेसे पैसे नसतानाही बँक त्या व्यक्तीला पैसे काढण्यास परवानगी देते तेव्हा या बँकींग प्रक्रियेला “ओव्हरड्राफ्ट” म्हणून ओळखले जाते. जेव्हा खाते शिल्लक शून्यावर पोहोचते तेव्हा बँकद्वारे क्रेडिट दिले जाते ज्यामुळे खातेदाराला पुरेसे पैसे नसतानाही पैसे काढता येतात. ओव्हरड्राफ्ट या पर्यायामध्ये बँके ग्राहकांना विशिष्ट रक्कम उधार घेण्याची परवानगी देतो, ग्राहक त्याच्या खात्यातून जीतकी रक्कम वापरतो त्यावर बँक व्याज आणि प्रक्रिया शुल्क आकारत असते. ओव्हरड्राफ्ट सुविधा शुल्काची रक्कम प्रत्येक बँके प्रमाणे वेगवेगळी असू शकते. Personal Loan Vs Overdraft
अनेकांना तत्काळ आर्थिक मदत देणारा ओव्हरड्राफ्ट पर्याय
अनेकदा आपण आर्थिक गरज भासल्यानंतर बँकेकडून वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा वाहन कर्ज अशा कारणांसाठी कर्जाची मागणी करतो. ही कर्जे बँकेकडून मंजूर होण्यास वेळ देखील लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक कागदोपत्री व्यवहार, सिबिल स्कोअर सारख्या गोष्टी कर्ज मिळवताना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. परंतु या कोणत्याही अतिरिक्त व्यवहारांमध्ये न अडकता आपले खाते असलेल्या बँकेकडून ओव्हरड्राफ्टची मागणी करणे अधिक सोपे आहे. अनेक अशा बँका आहेत ज्या ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक शून्य झाल्यावर ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवतात. ग्राहकांना मिनिमम बॅलन्स दंड लागू नये इतकाच त्यावेळी बँकेचे हेतू असतो. यामध्ये एक महत्त्वाचा फायदा असा असतो की, ओव्हरड्राफ्ट खाते असलेल्या बँका ग्राहकाचे सर्व पेमेंट पूर्ण होतील याची खात्री देतात. त्यामुळे तात्पुरते का होईना ग्राहकांना आर्थिक अडचण येत नाही.
कर्ज म्हणजे काय? What is loan in Marathi
बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून ग्राहकांमार्फत ठराविक रक्कम उधार घेतली जाते. ती रक्कम विशिष्ट कालावधीसाठी असून कर्जदाराने नियमित मासिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करणे बंधनकारक असते. मासिक हप्त्यांना आता EMI म्हणून ओळखले जाते. ग्राहक कर्ज घेताना बँका व्याजाचा दर ठरवून देतात.
वैयक्तिक कर्ज आणि ओव्हरड्राफ्टमधील फरक समजून घेऊ Personal Loan Vs Overdraft in Marathi
· वैयक्तिक कर्जावरील व्याज प्रत्येक महिन्याच्या एकूण रकमेच्या आधारे मोजले जाते. जर तुम्ही 2 लाख कर्ज घेतले असेल तर व्याज देखील 2 लाखाच्या रकमेवर आकारले जाते. ओव्हरड्राफ्टमध्ये, व्याज फक्त बँकेकडून घेतलेल्या रकमेवर आकारले जाते. ओव्हरड्राफ्ट या सुविधेमध्ये बँकेतून पैसे काढले नाहीत म्हणजेच रकमेचा वापर केला नाही तर ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे व्याज भरावे लागत नाही.
· वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा व्याजदर जास्त असतो. ओव्हरड्राफ्ट सुरक्षित असल्यास, व्याजदर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
· वैयक्तिक कर्जाचा कालावधी पूर्वनिर्धारित असतो, ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांना किती काळ कर्जाची परतफेड करायची आहे हे आधीच माहिती असते. याउल ओव्हरड्राफ्ट रकमेच्या परतफेडीचा कोणताही निश्चित कालावधी नसतो.
· वैयक्तिक कर्जामध्ये कर्जाच्या रकमेनुसार मासिक हप्ता (EMI) ठरविण्यात आलेला असतो. याउलट ओव्हरड्राफ्ट सुविधेतील परतफेड लवचिक असल्याने बँकेकडून घेतलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. म्हणजेच खात्यातील रक्कम काढल्यास फक्त व्याज भरावे लागते. ती रक्कम खात्यातच जमा राहिली असेल आणि ग्रहकाने ती वापरलीच नसेल तर त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज देण्याची गरज नसते.
वैयक्तिक कर्ज की ओव्हरड्राफ्ट कोणता पर्याय फायद्याचा?
Personal Loan Vs Overdraft यापैकी कोणता पर्याय ग्राहकांच्या फायद्याचा आहे असा प्रश्न विचारला गेल्यास आम्ही इतकेच सांगू की, या सर्व गोष्टी ग्राहकांच्या आर्थिक गरजेच्या क्षमतेवरुन ठरवता येतील. कमी कालावधीसाठी तत्काळ आर्थिक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी ओव्हरड्राफ्ट हा अत्यंत चांगला पर्याय आहे. कारण हा निधी तत्काळ ग्राहकाच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो. याउलट वैयक्तिक कर्ज दीर्घकालीन कर्जासाठी अधिक योग्य ठरते कारण यामध्ये महिन्याला हप्ते भरायचे असतात. ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट यापैकी कोणताही पर्याय निवडला तरी इतके मात्र नक्की की, पैसे परत करण्यासाठी वेळीच योग्य ती तरतूद करणे गरजेचे आहे.
जाणून घ्या ओव्हरड्राफ्टचे फायदे
भारतातील अशा अनेक बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. जर का तुम्हाला कमी कालावधीसाठी आर्थिक गरज असेल तर तुम्ही ओव्हरड्राफ्टचा पर्याय निवडू शकता. अनेकांना ओव्हरड्राफ्ट या बँकिंग पर्यायाबद्दल गैरसमज असतात. त्यांच्यासाठी आम्ही ओव्हरड्राफ्टचे फायदे समजाऊ सांगणार आहोत.
· व्यवसायिक त्यांच्या अल्पकालीन आर्थिक गरजांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात
· फारशी कागदपत्रे आणि दीर्घ प्रक्रियांशिवाय कर्ज लवकर मंजूर केले जाते त्यामुळे ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेणे सोपे आहे.
· तत्काळ क्रेडिट मिळवण्याचा हा अत्यंत सोपा मार्ग आहे, ज्याचा वापर गरजेनुसार करता येतो.
· ओव्हरड्राफ्ट पर्यायाचा एक महत्त्वाचा फायदा असो तो म्हणजे, फक्त वापरण्यात आलेल्या रकमेवर व्याज देणे बंधनकारक असते परंतु संपूर्ण रकमेवर व्याज देणे बंधनकारक नाही.
· रोख रकमेची तातडीची गरज असलेल्या छोट्या व्यवसायांसाठी, ओव्हरड्राफ्ट्स तुम्हाला आदर्श वित्तपुरवठा उपाय देतात. अचानक होणारा खर्च सुरळीतपणे हाताळता येईल.
अत्यंत महत्त्वाचे
प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजा आर्थिक क्षमतांप्रमाणे ठरवाव्यात. आर्थिक क्षमता कमी असेल आणि गरजा मोठ्या असतील तर आर्थिक अडचणी या निर्माण होतच राहतील. वैद्यकिय किंवा शैक्षणिक प्रश्नांच्या बाबतीत आलेल्या आर्थिक अडचणी टाळता येत नाहीत. त्यामुळे शिक्षण आणि औषधोपचार या गोष्टींसाठीच वैयक्तिक कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सारख्या पर्यायांचा विचार करावा. कर्ज, आर्थिक नियोजन किंवा बँकिंग क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटसोबत जोडले जा. वेबसाईटवर दिलेला व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सामील व्हा जेणेकरुन तुम्हाला पोस्ट झालेल्या माहितीपूर्ण लेखांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील.