दिवाळीला बोनस मिळालेले पैसे या 3 योजनांमध्ये गुंतवा, मिळेल चांगला परतावा.
आजच्या युगात महागाई ने थैमान घातले आहे. प्रत्येक वस्तूमध्ये महागाई 7वाढलेली आपल्याला दिसून येत आहे अगदी किराणा पासून कपड्यांपर्यंत A टू Z वस्तूंवर महागाई वाढलेली आहे. आजकाल लोकांचा Income जरी वाढला असला तरी महागाई च्या तुलनेत तो अतिशय किरकोळ आहे. या साठी पैश्याची बचत करून त्याची गुंतवणूक करणे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
आर्थिक नियोजन:-
आर्थिक नियोजन करण्यासाठी सर्वप्रथम फालतू खर्च टाळावे उदर्णार्थ, महागड्या गाड्या, कर्ज, महागडे शौक इत्यादी, खर्च करून जे पैसे शिल्लक राहतील त्या पैश्याची गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी प्रत्येक गोष्टीचे बजट आखावे आणि त्यानुसार खर्च करावा. आता दिवाळी मध्ये बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचारी लोकांना चांगल्या प्रकारे बोनस देतात या लोकांनी फालतू खर्च टाळून ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात बोनस चे पैसे कोणत्या ठिकाणी तुम्ही गुंतवू शकाल या बद्दल आयडिया देणार आहोत.
1)Mutual Funds:-
दिवाळी मध्ये मिळालेला बोनस तुम्ही mutual funds मध्ये गुंतवू शकता. चांगले फंडस् शोधून दीर्घ काळासाठी या मध्ये गुंतवणूक केली तर या बदल्यात भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील.
2) शेयर मार्केट:-
सध्या शेयर मार्केट मध्ये जोरदार घसरन आली आहे त्यामुळे बरेच स्टॉक चांगल्या भावात मिळत आहेत त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही उत्तम वेळ आहे. जेव्हा शेयर मार्केट पडलेले असते त्याच वेळी खरेदी करायची असते. तर दिवाळी बोनस चे पैसे स्टॉक मार्केट मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवून भविष्यात चांगला परतावा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिस:-
पोस्ट ऑफिस च्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये दिवाळीला मिळालेल्या बोनस चे पैसे गुंतवू शकता. गुंतवलेल्या रकमेवर पोस्ट 7.4 टक्के व्याजदर देते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळेल.
Post Comment