Kulhad Making Business Idea: मातीच्या कपामध्ये चहा पीणे हे प्लॅस्टिकच्या कपापेक्षा अधिक चांगले समजले जाते. बाहेर छोट्या छोट्या चहा टपऱ्यांवर प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा दिला जातो. त्यामुळे गरम चहामध्ये प्लॅस्टिक वितळून त्याचे कण पोटात केल्याचे तपासात सापडल्याने, प्लॅस्टिकच्या कपात चहा पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक असलायाचे समजले जाते. त्यावर उपाय म्हणून मातीच्या कपांमध्ये चहा विकला जातो आणि लोक देखील तो आनंदाने पीतात. त्या मातीच्या कपाला कुल्हड असे म्हटले जाते. आणि केंद्र सरकार कुल्हड बनविण्याच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मदत करीत आहे. सरकारी मदतीमुळे अगदी कमी पैसे गुंतवून हे मातीचे कप बनविण्याचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. कारण प्रत्येक गल्लीबोळात कुल्हड चहाला मागणी आहे. या व्यवसायात तुम्ही मोठी कमाई करू शकता. रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल्स यांसारख्या ठिकाणी कुल्हड ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
कमी भांडवलात भरपूर कमाई
जर तुम्हाला असा व्यवसाय सुरू करायचा असेल ज्यामध्ये भरपूर कमाई असेल आणि भांडवल कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू करण्याची बिझनेस आयडिया देत आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकारची स्टार्टअप योजना किंवा कारागिरांसाठी सुरु करण्याच आलेली योजना मदतगार ठरु शकते.
सरकार कशी करेल मदत?
सरकार कुल्हड बनवण्यासाठी इलेक्ट्रिक चाके देते. ज्याच्या मदतीने कोणीही सहज कुल्हड बनवू शकतात. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी काही काळापूर्वी माहिती दिली होती की 2020 मध्ये केंद्र सरकारने 25,000 इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले होते. जे कुल्हड किंवा मातीच्या वस्तू बनविण्यासाठी उपयोगी असतात. सरकारही कारागिरांकडून चांगल्या दराने कुल्हड खरेदी करते.
कुल्हड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल
कच्च्या मालाबद्दल बोलायचे झाले तर ते तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीची माती वापरली जाते. हि माती कोणत्याही नदी किंवा तलावाच्या आसपास मिळू शकते. कुल्हड कितीही आकाराचा बनवायचा असेल तर त्या आकारानुसार बाजारातून साचा विकत घेऊ शकता. कुल्हड बनवल्यानंतर ते मजबूत करण्यासाठी शिजवावे लागते. यासाठी मोठ्या आकाराची भट्टी लागते. भट्टी बांधल्यानंतर, आपण त्यात तयार केलेले कुल्लड शिजवू शकता. सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने लवकरच रेल्वे स्थानके, बस डेपो, विमानतळ आणि मॉल्समध्ये कुल्हडची मागणी वाढू शकते.
कुल्हडच्या व्यवसायात किती कमाई होणार?
चहा कुल्हड अतिशय किफायतशीर असण्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही अतिशय सुरक्षित मानला जातो. सध्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर चहा कुल्हडचा भाव सुमारे 250 रुपये प्रतिशेकडा आहे. तसेच दुधासाठीच्या कुऱ्हाडची किंमत 350 रुपये प्रतिशेकडा. तसेच मोठे लस्सी कपची किंमत 100 रुपये आहे. मागणी वाढल्यास दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. आता सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्याच्या किमती आणखी वाढू शकतात. इतकेच नाही तर हे कुल्हड बनवून तुम्ही https://dir.indiamart.com/ इंडिया मार्ट सारख्या वेबसाईटवर त्याची विक्री देखील करु शकता. तुम्हाला समोरुन ऑर्डर येतील. —