Equity Meaning in Marathi – तर आपण शार्क टॅंक हा खूप प्रख्यात शो बघत असतो तर यामध्ये आपण पाहत असतो कंपनीचे फाउंडर हे इक्विटीच्या बदल्यात रुपये घेत असतात पण हे नक्की चक्र आहे तरी काय इक्विटी म्हणजे नेमकं काय नेमकं याचा फायदा इन्वेस्टरसला कसा होतो किंवा ही पूर्णपणे इकोसिस्टीम आपण थोडीशी समजून घेऊया.
Equity Meaning in Marathi
तर आपण एकदम सोप्या उदाहरणाने ही गोष्ट समजून घेऊ तर समजा अभिषेक आणि ऋषिकेश यांनी कंपनी काढली आणि त्यामध्ये पाच पाच लाख रुपये गुंतवले याचा अर्थ एकूण दहा लाख हे झाले बेड ऑफ कॅपिटल आता अभिषेक आणि ऋषिकेश या दोघांची यामध्ये पन्नास पन्नास टक्के पार्टनरशिप असेल तर ओनरशिप आहे एक प्रकारे इक्विटी आहे. म्हणजे दोघेही फाउंडर्स 50%-50% इक्विटीचे मालक आहेत.
उदाहरण
या उदाहरणात समजून घ्यायचं म्हणजे इक्विटी जे असते तेच म्हणजे ओनरशिप याला छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये त्याचे खूप सारे पार्ट्स केले तर त्याला आपण शेअर्स म्हणतो.
आपल्या उदाहरणांमध्ये अभिषेक आणि ऋषिकेशने पाच पाच लाख रुपये गुंतवले आहेत सहसा एका शेअरची किंमत दहा रुपये ठेवली जाते म्हणजेच अभिषेकचे पन्नास हजार शेअर्स आणि ऋषिकेश चे 50000 शेअर्स असे एलोकेशन होईल.
म्हणजे तुम्हाला कळत असेल की आता या शेअरची किंमत म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीची किंमत बरोबर?
५०,००० x१० = ५,००,०००
५०,०००x१० = ५,००,०००
आता आपण याच उदाहरणाला पुढे वाढवूया ते म्हणजे असे की समजा अभिषेक आणि ऋषिकेश ला आणखी पैशाची गरज असेल म्हणजेच आणखी फंडिंग ची गरज असेल आणि ते समजा गेले आता शार्क टॅंक मध्ये आणि त्यांनी डिमांड केली की एक करोड ५% इक्विटीसाठी . याचा अर्थ 5% ची ओनरशिप ते गुंतवणूकदारांना देऊ इच्छित आहेत एक करोड रुपयांच्या बदल्यात.
आता समजा त्यांच्यामध्ये भाव तो झाला म्हणजेच जर का गुंतवणूकदार असं म्हणले की आम्ही दहा टक्के च्या ऐवजी करोड देऊ पाच टक्के च्या ऐवजी नाही देऊ शकत. तर त्याचा इफेक्ट हा डायरेक्ट कंपनीच्या व्हॅल्युएशन वर होतो तो कसा आपण समजून घेऊ
Valuation= (amount of funding) / (% of equity)
म्हणजेच सोप्या भाषेत आपण समजून घेऊ जसे की भावतुल होयच्या आधी अभिषेक आणि ऋषिकेशने पाच टक्के च्या बदल्यात एक करोड मागितले तर वरती दिलेल्या फॉर्मुल्यानुसार कंपनीची किंमत झाली 20 करोड रुपये.
Valuation = १,००,००,००० /५%
पण आता गुंतवणूकदार भावतली नंतर म्हणाले की दहा टक्के च्या ऐवजी एक करोड देऊ तर वरच्या फॉर्मुल्यानुसार कंपनीची किंमत झाली 10 करोड रुपये म्हणजे अभिषेक आणि ऋषिकेशने जी कंपनीची किंमत लावली होती त्याच्या अगदी निम्मी.
Valuation = १,००,००,०००/ १०%
आता समजा दहा टक्के साठी एक करोड ही गुंतवणूकदारांची ऑफर कंपनीच्या फाउंडर ने ने एक्सेप्ट केली तर मग अभिषेक आणि ऋषिकेश दोघांकडे 50 टक्के 50 टक्के ओनरशिप होती म्हणजेच इक्विटी होती ती कमी होऊन 45% -45% राहील बाकीचे दहा टक्के गुंतवणूकदारांकडे.
कंपनीची किंमत कशी ठरवली जाते
सहसा सुरुवातीला कंपनीची किंमत ठरवणे हे खूप अवघड असते कारण कंपनीचे विजन कंपनीचा बिजनेस किंवा त्याचे फ्युचर प्रोजेक्शन हे काढणे अवघड असते किंवा एखाद्या स्टार्टअप ला मार्केट कसा रिस्पॉन्स देईल याचा अंदाज सुद्धा लावणे अवघड असते परंतु याला नंबरच्या रूपात काही प्रॅक्टिस हे मार्केटमध्ये केली जाते ते म्हणजे असे की एखादा बिजनेस किती सेल्स करतो म्हणजेच किती रेवेन्यू जनरेट करतो याच्या दोन ते पाच मल्टिपल मध्ये त्या कंपनीची व्हॅल्युएशन हे गुंतवणूकदार ठरवतात म्हणजे समजा एखाद्या बिझनेसने त्या फायनान्शिअल इयर मध्ये समजा एक करोडचा रेवेन्यू जनरेट केला म्हणजेच सेल्स जनरेट केला तर गुणिले पाच म्हणजेच कंपनीची व्हॅल्युएशन गुंतवणूकदार दोन करोड ते पाच करोड च्या मध्ये लावतात.
आता याचा अर्थ असा की ही जी व्हॅल्युएशन असते या रुपयात पूर्ण कंपनी खरेदी केली जाऊ शकते म्हणजेच एखादा बिजनेस जर एक करोडचा सेल्स करतोय, तर त्याची व्हॅल्युएशन ही तीन ते पाच करून लावली जात असेल याचा अर्थ ते पूर्ण कंपनीला खरेदी करण्यासाठी तीन ते पाच करोड रुपये ही किंमत खरेदी करला मोजावी लागणार.
FAQs on Equity Meaning in Marathi
What is Equity Meaning in Marathi?
इक्विटीचा वापर अनेकदा आर्थिक व्यवस्थेमध्ये कंपनीतील (जसे की समभाग किंवा समभाग) मालकीचे हित दर्शविण्यासाठी केला जातो.