ॲपलच्या भारतातील विस्तारामुळे 6 लाख रोजगार निर्माण होतील, 70 टक्के महिलांना होणार फायदा!!!

ॲपल ही एक अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी नव्या तंत्रज्ञानावर आधारित गॅजेट्सची निर्मिती करते, ॲपल कंपनीचे मोबाईल फोन ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. याच ॲपल कंपनीने चीनमधून माघार घेतल्याने आणि भारतात उत्पादन आणि व्यवसाय वाढवल्याने येथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

भारतात ॲपलच्या उत्पादनाची वाढ

अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारतात आपल्या उत्पादनांची व्याप्ती वाढवून, Apple सहा लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करू शकते, त्यापैकी सुमारे 70 टक्के नोकऱ्या महिलांना मिळतील असे मत नोंदवले जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ॲपल अंदाजे दोन लाख थेट नोकऱ्या निर्माण करेल. अहवालात दिलेल्या सरकारी अंदाजानुसार, प्रत्येक प्रत्यक्ष नोकरीसाठी, साधारणपणे किमान तीन अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतात. या हिशेबातून एकूण पाच ते सहा लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

असे संकेत आहेत की,

असे संकेत आहेत की Apple भारतात प्रथमच त्यांच्या आगामी iPhone 16 मालिकेतील हाय-एंड प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सचे एकत्रीकरण करण्याचा विचार करत आहे. ॲपलच्या भागीदार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या माध्यमातून तमिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर प्लांटमध्ये उत्पादन केले जाईल. ब्लूमबर्ग न्यूजनुसार, कंपनीने तामिळनाडूमधील आपल्या कारखान्यात हजारो कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

its glowtime नव्या टॅगलाईनसह दमदार भरारी

कॅलिफोर्नियास्थित ऍपल कंपनीने ने 9 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या ‘इट्स ग्लोटाइम’ या टॅगलाइनसह एका कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. इव्हेंट दरम्यान चार नवीन आयफोन 16 मॉडेल लॉन्च केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने अलीकडे शेअर केले की Apple ने M4 चिपसह सुसज्ज असलेल्या पहिल्या Mac च्या विकासाला गती दिली आहे, जी सुरुवातीला नवीनतम iPad Pro सह सादर करण्यात आली होती. आगामी लाइनअपमध्ये MacBook Pro, Mac Mini आणि iMac च्या नवीनतम आवृत्त्यांचा समावेश अपेक्षित आहे, जे सर्व M4 चिपसह सुसज्ज असतील.

Leave a comment