बजाज कंपनी विविध प्रकारची उत्पादने घेते परंतु आजच्या तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या टुव्हिलर बनविण्यात बजाज कंपनी नेहमीच अग्रेसर मानली गेली आहे. कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली आहे. याला देशभरातील ग्राहकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग बजाज कंपनीच्या या CNG बाईकबद्दल अधिक माहिती मिळवूया.
बजाज फ्रीडम 125 बाईकची 77 शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू होणार
बजाज कंपनी 15 ऑगस्ट रोजी ग्राहकांना भेट देणार आहे. जगातील सर्वात पहिली सिएनची बाईक भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनापर्यंत 77 शहरांमध्ये फ्रीडम 125 ची डिलिव्हरी सुरू करणार आहे. बाईक लाँच झाल्याच्या पहिल्या आठवड्यात 30,000 हून अधिक लोकांनी बजाज फ्रीडम 125 CNG बाईक मध्ये इंट्रेस्ट दाखवला आहे.
1000 रुपये टोकन देऊन तुम्ही ही बाईक बुक करु शकता
बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईक खरेदी करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर 95 हजार रुपयांची बाईक तुम्ही फक्त 1000 रुपये देऊन बुक करु शकणार आहात. चला तर मग या बाईकबद्दल अधिक माहिती मिळवूया.
बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईकची फीचर्स
बाईक प्रेमींसाठी बजाजची नवीन सीएनजी बाइक तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या एंट्री लेव्हल ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये, मिड व्हेरिएंट ड्रम LED ची किंमत 1.05 लाख रुपये आणि टॉप एंड डिस्क LED व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. फ्रीडम एंट्री-लेव्हल व्हेरिएंटला पुढील आणि मागील व्हिल्सवर ड्रम ब्रेक, हॅलोजन हेडलाइट्स देखील उपलब्ध आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर नाही. समोर 240 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक जोडण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, फुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स आहेत. या बाईकमध्ये पेट्रोल + CNG पॉवर स्पोर्टसह 125cc इंजिन आहे. हे इंजिन 9.4 बीएचपी पॉवर आणि 9.7 एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईक देईल इतके मायलेज
बजाज कंपनीचा दावा आहे की ही बाईक सीएनजीवर 102 किमी प्रति किलो आणि पेट्रोलवर 64 किमी प्रति लिटर मायलेज देते. तुमचा इंधन खर्च 50% पर्यंत वाचू शकतो कारण दोन्ही इंजिन पूर्ण टाकीवर 330 किलोमीटरची रेंज देतात. या बाईकच्या सेफ्टी चांगली असावी यासाठी बजाज ऑटोने 11 व्हेरिएंटच्या क्रॅश टेस्टिंग केल्या आहेत. बजाज फ्रीडम 125 CNG बाईकसह तुम्ही पेट्रोल बाईकच्या तुलनेत दर महिन्याला किमान 1,800 रुपये वाचवू शकणार आहात.