Triumph Discount Offer: ट्रायम्फच्या या बाईकवर कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट; ही ऑफर फक्त 31 ऑगस्टपर्यंत.

Discount on Triumph Motorcycle सध्याच्या तरुणाईमध्ये बुलेट बाईक्सची लोकप्रियता वाढत चालली आहे. बुलेट चालवण्यामध्ये आजची तरुणाई वेगळाच स्वॅग असल्याचे सांगतात. अत्यंत कंम्फर्ट आणि दूरच्या प्रवासात साथ निभावणारी अशी या बुलेट बाईकची ख्याती आहे. कित्येक तरुण तरुणी तर लेह लडाख किंवा भारत भ्रमणासाठी बुलेट बाईकचीच निवड करतात. बुलेट बाईक खरेदी करताना  रॉयल एनफिल्ड या बाईकला मागणी असल्याचे दिसून येते परंतु रॉयल एनफिल्ड प्रतिस्पर्धी  असलेली बाईक्स ट्रायम्फवर सध्या डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. याआधी ही ऑफर 31 जुलैपर्यंतच देण्यात आली होती परंतु बुलेट लव्हर्सच्या मागणीवर या ऑफरची मर्यादा 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. चला तर मग या ट्रायम्फ बाईक्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

triumph bike
triumph bike

कंपनीच्या 1st anniversary निमित्त ऑफर

ट्रायम्फ मोटरसाइकिल्स लिमिटेड या कंपनीला 1 वर्ष पूर्ण झाले आणि 1st anivarsary निमित्त ही कंपनी त्यांच्या ट्रायम्फ स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400 वर डिस्काउंट ऑफर देत आहे.

यापुर्वी ही ऑफर केवळ 31 जुलै 2024पर्यंत होती परंतु आता ती  31 ऑगस्ट 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. रॉयल एनफिल्डला शार्प टक्कर देणाऱ्या या बाईकवर तब्बल 10,000/- हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. https://www.triumphmotorcyclesindia.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू शकता.

ट्रायम्फ बाईकची नवीन किंमत इतकी आहे.

ट्रायम्फच्या 400 सीसी बाईकवर तब्बल 10,000 रुपयांची सूट कंपनी देत आहे.  ट्रायम्फ मोटरसाइकिल्स लिमिटेड  ही  ब्रिटन मधील मोटरसायकल बनविणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

या कंपनीच्या बाईक्स 50 हून अधिक देशांमध्ये बाईक्सची निर्यात केल्या जातात. कंपनी ही ऑफर 50 हजार युनिट्सच्या विक्रीवर देत आहे. या डिस्काउंट ऑफरमुळे ट्रायम्फ स्पीड 400 ची किंमत 2.24 लाख रुपये इतकी आहे. Discount on Triumph Motorcycle

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

ट्रायम्फची प्रतिस्पर्धी बाईक रॉयल एनफिल्ड गुरिल्ला 450

भारतात तरुणांना भुरळ पाडणाऱ्या या प्रीमियम बाईकची मागणी सातत्याने वाढत असल्याते दिसून येते.  अलीकडेच, ट्रायम्फच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या रॉयल एनफिल्डने गुरिल्ला 450 लाँच केले. या बाईकच्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर, ट्रायम्फने ऑगस्टमध्येही आपली सवलत ऑफर सुरू ठेवली आहे.

ट्रायम्फ स्पीड 400 बाईक

ट्रायम्फ स्पीड 400 या बाईकला असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. इतकेच नाही तर या  बाईकमध्ये बसवलेले इंजिन 8,000 rpm वर 39.5 bhp ची पॉवर देते. तसेच 6,500 rpm वर 37.5 Nm टॉर्क जनरेट करते. ट्रायम्फ स्पीड 400 हे TR-सिरीज लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह, DOHC, सिंगल सिलेंडर इंजिनद्वारे उपलब्ध करुन देण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X बाईक

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 बाईक  ही तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि  व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बाईकमध्ये DRL सोबत एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत देखील आहेत.  या बाईकची पेट्रोल क्षमता 13 लीटर इतकी आहे. त्यामुळे आजची तरुणाई दूरच्याा प्रवासासाठी ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X बाईकच पसंत करतात. Discount on Triumph Motorcycle

Leave a comment