PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana ) 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये कधी येतील.
शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्ते मिळाल्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. परंतु 18 वा हप्ता कधी मिळणार आहे याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही. अशा शेतकऱ्यांची नावे सतराव्या हप्त्यांमध्ये वगळण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्याचबरोबर तुम्हालाही पीएम किसान चा अठरावा हप्ता आणि त्या पुढील हप्ते हवे असल्यास तुम्हाला या योजनेत नियमात करण्यात आलेल्या बदलांची व्यवस्थित माहिती पूर्ण करावी लागेल. तरच तुम्ही यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता.
चुकूनही ‘या’ चुका करू नका
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे लागेल. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे ही आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची पडताळणी करून घेणे खूप गरजेचे आहे. या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पडताळणी प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर त्यांना 2 हजार रुपयांपासून वंचित रहावे लागेल.
शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार 18 व्या हप्त्याचे पैसे?
शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरावा हप्ता कधी जमा होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु पीएम किसान योजनेच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर अठराव्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात जमा होऊ शकतात. ज्याचं कारण म्हणजे चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याचे वितरण केले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर सतराव्या हप्त्याची पैसे जून महिन्यात जमा करण्यात आले होते. यानुसार आता 18 व्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात खात्यावर येऊ शकतात.