भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे Life Insurance Corporation of India (LIC) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही एक विमा कंपनी असून यामध्ये जास्तीत जास्त शेअर्स हे भारत सरकारचे आहे. भारतातील नागरिकांना विम्याच्या मदतीने भविष्यात आर्थिक सुरक्षितता अनुभवता यावी यासाठी या शासकीय संस्थेची स्थापना करण्यात आली. ही कंपनी ग्राहकांसाठी विविध बचत योजना आणि जीवन विम्याच्या योजना राबवत असते. चला तर मग अशी एक नाविण्यपूर्ण योजना पाहू ज्यामध्ये एकदाच प्रीमियम भरून तुम्ही आयुष्यभर पेन्शन मिळवू शकणार आहात.
एलआयसीचा पेन्शन देणारा प्लॅन
एलआयसीकडून दिला जाणारा हा एक पेन्शन प्लॅन आहे. याला ‘सरल पेन्शन प्लॅन’ म्हटले जाते. या योजनेअंतर्गत पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन चालू होते. ही पॉलिसी घेताना तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागतो. प्रिमियम दिल्यानंतर विमाधारकाला लगेच पेन्शन मिळणे चालू होते. पॉलिसी घेणाऱ्याचा जर का मृत्यू झाला तर गुंतवलेल्या रकमेतील उर्वरीत रक्कम पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला परत दिली जाते.
जोडीदारासोबत किंवा एकट्याने हा प्लॅन घेता येतो
सरल पेन्शन योजनेचा फायदा एकट्याने किंवा जोडीदारासोबत घेता येतो. एकट्या व्यक्तीने घेतलेल्या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक जोपर्यंत जिंवत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. पॉलिसीधारकाचा जर का मृत्यू झाला तर गुंतवलेली रक्कम नॉमिनीला परत दिली जाते. पती-पत्नीसाठी एकत्रित प्लॅन घेतला असल्यास मुख्य पॉलिसीधारकाला तो जिंवत असेपर्यंत पेन्शन मिळते आणि मुख्य पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या जोडीदाराला पेन्शन सुरु राहते. दोघांचाही मृत्यू झाला असल्यास उर्वरीत रक्कम नॉमिनीला दिली जाते.
पेन्शन किती मिळणार?
पॉलिसीधारकाने गुंतवलेल्या रकमेच्या अनुषंगाने किती पेन्शन द्यायचे हे ठरवले जाते. तसेच कोणत्या वयात पैसे गुंतवले आहेत आणि पुढे किती वर्षे हे पैसे तुम्हाला मिळत राहणार आहेत याप्रमाणे पेन्शन ठरते. पॉलिसीधारक 1000 रुपयांचे मासिक पेन्शन सुद्धा घेऊ शकतात.
वयाच्या 40 वर्षांपासून घेऊ शकता फायदा
एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅन अंतर्गत तुम्ही वयाच्या 60 ची किंवा 70 ची वाट पाहण्याची गरज नाही. हा प्लॅन घेतलेली व्यक्ती 40 व्या वयापासून घेऊ शकता. 40ते 80 वर्षांपर्यंत कधीही या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. सरल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक करत असाल तर 40 व्या वयापासून तुम्हाला पेन्शन सुरु होते. पॉलिसीधारक जीवंत असेपर्यंत ही पेन्शन सुरु राहते.
सरल पेन्शन योजनेवर लोन मिळवणे सोपे
LIC च्या सरल पेन्शन योजनेवर तुम्ही लोन देखील मिळवू शकता. इतकेच नाही तर आर्थिक अडचणीच्या वेळी तुम्हाला पॉलिसी सरेंडर देखील करता येते.
1 thought on “आयो ! एकदाच प्रिमियम, आयुष्यभर पेन्शन !! LIC च्या या प्लॅन बद्दल वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!”