Maruti Suzuki XL6: मारुती कंपनीने आत्ताच लाँच केलेल्या 7 सीटर maruti Suzuki XL6 या सर्वोत्तम कारची माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सध्या तरुणाईमध्ये फॉर्च्युनर, रेंज रोव्हर सारखी वाहनांची खूप क्रेज आहे परंतु या वाहनांसोबत स्पर्धेला उतरू शकेल अशी maruti Suzuki XL6 बद्दल अधिक माहिती जाणून घ्या आणि लवकरच मारुतीच्या शोरुमध्ये या कारच्या टेस्ट ड्राईव्हसाठी स्लॉट बुक करा. तुम्हाला ही कार नक्कीच आवडेल. चला तर मग maruti Suzuki XL6 च्या फिचर्स, किंमत आणि इंटेरिअयरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मारुती सुझुकी XL6 फीचर्स
मारुती सुझुकी XL6 या फोरव्हिलर कारमध्ये मॉडर्न 7 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारख्या फीचर्ससह देण्यात येते. इतकेच नाही तर 6 स्पीकर सिस्टीम देखील देण्यात आले आहेत. फूट शिफ्टर 360 डिग्री कॅमेरासह येतो ज्यामध्ये तुम्हाला क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक एअर कंडिशनरची सुविधा देखील देण्यात आली आहे. 7 सीटर सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी XL6 कार खळबळ देणार आहे. कारण यामध्ये लक्षवेधक इंटीरियर करण्यात आले आहे. maruti Suzuki XL6
मारुती सुझुकी XL6 इंजिन
मारुती सुझुकी XL6 या वाहनाच्या इंजिन कार्यक्षमतेबद्दल सांगताना आम्हाला आनंद होत आहे की, यामध्ये BS6 उत्सर्जन मानदंडांसह एक हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. जे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन सह 103 हॉर्स पॉवरसह मिळेल. पाच-स्पीड मॅन्युअल आणि चार स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सचा पर्याय सीएनजी व्हेरिएंटसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही कार 26.32 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देणारी ठरणार आहे. maruti Suzuki XL6
मारुती सुझुकी XL6 ची किंमत जाणून घ्या!
मित्रांनो, जर आपण किंमतीबद्दल बोललो तर आम्ही तुम्हाला सांगतो की मारुती कंपनीकडून येणारे हे चारचाकी वाहन तुम्ही 13 लाख 33 हजार 095 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.फक्त 2.10 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटने देखील ही कार तुम्ही खरेदी करू शकता, जिथे तुम्हाला उर्वरित रकमेचे वाहन कर्ज 8% व्याजदराने करता येणार आहे. यामध्ये तुम्हाला महिना 23,752/- इतक्या रुपयांमध्ये तुम्हाला आनंद घेता येणार आहे. maruti Suzuki XL6