Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train: महाराष्ट्रातून सुरु होणार स्लीपर वंदे भारत,पहा प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी या रेल्वेमार्गाने प्रवास सुरळीत व्हावा यासाठी नेहमीच रेल्वे विविध प्रयत्न करीत असते.  भारतीय रेल्वेने आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि राज्यांतर्गत देखील प्रवेस अतीवेगाने व्हावा यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु केली आहे. ही  रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यामुळे विविध मार्गांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर येणार आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपूर ते पुणे दरम्याने सुरु होणार आहे. या संदर्भात हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. नागपूर-पुणे मार्गावर गरीब रथ, अंजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेस ट्रेन सुरु आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.  प्रवाशांचा वाढता प्रतीसाद पाहता या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरु करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train

vande bharat pune nagpur
vande bharat pune nagpur

स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्ग

नागपूर-पुणे रेल्वेमार्गावरुन स्लीपर वंदे भारत ट्रेन संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी,  त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेनमुळे नागपूर ते पुणे प्रवास कमी वेळेत होणार आहे. ही ट्रेन स्लीपर असणार आहे. Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train

पुणे शहरातून थेट ट्रेन मिळणार

नागपूर-पुणे प्रवास करण्यासाठी बरेचदा रेल्वेच्या तिकिट्स मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना रोडने खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.  परंतु आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या मार्गावर आणखी एक गाडी सुरु होणार असल्याने अनेकांना वेगाने आणि सुविधाजनक प्रवास करता येणार आहे. नागपूरवरुन बिलासपूर आणि नागपूर-इंदूर मार्गावर वंदे भारत ट्रेन आहे. परंतु ही ट्रेन चेअर कार आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ही पुण्याला थांबते. Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train

स्लीपर वंदे भारताची ही आहेत वैशिष्ट्ये?

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये कुशन असणारे स्लीपर बर्थ देण्यात आले आहेत.  तसेच स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये  उत्तम दर्जाच्या नॉइज कॅन्सलेशन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर मोबाइल चार्जिंगसाठी सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. स्लीपर कोचमध्ये सेन्सर असणारे लाईट असतील. हे लाईट त्या त्या कोचमध्ये प्रवासी असतील तेव्हा  चालू होईल, नाहीतर  बंद राहतील. अशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train

Leave a comment