पैसे ट्रान्स्फर करण्याच्या या जुन्या पण विश्वासू प्रकारांबद्दल जाणून घेऊ

आज ऑनलाईन मनी ट्रान्स्फर करण्यासाठी UPI, गुगल पे, फोन पे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू आजही अनेक शासकीय कंपन्या असो किंवा खाजगी मोठ्या कंपन्या पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी NEFT, IMPS, RTGS या बँकांच्या पारंपरिक सुविधांचा वापर केला जातो. या सुविधांबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

NEFT ने पैसे ट्रान्सफर

नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर (NEFT) च्या माध्यमातून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर SMS किंवा ईमेलच्या माध्यमातून खातेदाराला माहिती दिली जाते. NEFT व्यवहार दोन तासांच्या आत पूर्ण होतात. RBI ने एनईएफटी व्यवहारांवर कोणतीही मर्यादा लावलेली नाही. परंतु बँका NEFT ट्रान्सफर वर स्वतःची मर्यादा लागू करू शकतात. 10000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी बँक प्रत्येक व्यवहारासाठी 2.5 रुपये आणि GST आकारते. तसेच ट्रान्सफरची रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 25 रुपये आणि GST लावला जातो.

IMPS ने पैसे ट्रान्सफर

बँकांमधून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) याला IMPS  असेही म्हटले जाते.   RBI ने अधिकृत केलेल्या बँकांमार्फत झटपट पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा या मार्फत मिळते. ही सुविधा कोणत्याही बँकेच्या प्रत्येक खातेदारासाठी 24 तास उपलब्ध असते. IMPS ट्रान्सफरच्या सुविधेसाठी ग्राहकांना 25 रुपयांपासून पुढे किती रक्कम ट्रान्सफर केली गेली आहे त्याप्रमाणे शुल्क भरावे लागते.

RTGS ने पैसे ट्रान्सफर

रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ही एक बँकिंग प्रणाली आहे.  या बँकिंग सुविधेसह नागरिकांना अनेक फायदे मिळतात. ही पैसे ट्रान्सफर करण्याची सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रणाली मानली जाते. 2 ते 5 लाखापर्यंतच्या व्यवहारासाठी सेवा शुल्क 24.50 रुये आणि GST असे खातेदाराकडून आकारले जातात. 5 लाखापेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करायची असल्यास 49.50 रुपये सेवा शुल्क बँका आकारतात.

UPI ने तत्काळ मनी ट्रान्स्फरच्या बदलत्या सुविधांच्या काळात आज देखील NEFT, IMPS, RTGS हे पेसे ट्रान्स्फर करण्याचे सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग आजही वापरले जातात. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment