आपल्याला जेव्हा जेव्हा रोख पैशांची गरज असते तेव्हा तेव्हा आपण एकतर बँकेत किंवा ATM मध्ये जाऊन कॅश काढून आणतो. यातील बँकेत जाण्याचा पर्याय आपण अनेकदा नाकारतो कारण तेथे खूप गर्दी असते आणि वेळही खूप लागतो. परंतु ATM मधून मात्र आपण झटपट कॅश काढून आणू शकतो. याआधी मात्र कोणत्याही ATM कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक असायचे. कधी एटीएम पीन विसरल्यास किंवा कधी कार्ड घरीच विसरल्यास आपल्याला कॅश काढता येत नसे, परंतु आता डिजिटलायझेशनच्या काळात ही देखील चिंता संपली आहे. मग हे कसे? हेच जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा आणि एटीएम कार्ड शिवाय कॅश काढा अगदी काही सेकंदात. Withdraw money without ATM card
Withdraw Money Without ATM Card
आता युपीआयच्या मदतीने ATM मधून पैसे काढता येणार
बँकिंग व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून आर्थविश्वात क्रांती झाली आहे. यात सर्वात मोठा वाटा आहे तो UPI सिस्टिमचा. UPI च्या मदतीने आपण कोणत्याही बँकेच्या खात्यातून पैसे घेण्या देण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी झाली आहे. यामध्ये आता भर पडली आहे ती एटीएम सुविधेची. आता आपण आपल्या एटीएम कार्डशिवाय पैसे काढू शकणार आहोत तेही UPI च्या मदतीने. अत्यंत सोपी पद्धत असून, कॅश काढण्यासाठी सुरक्षित देखील आहे. चला तर मग जाणऊन घेऊया UPI च्या मदतीने एटीएम मधून पैसे कसे काढायचे? Withdraw money without ATM card
या पद्धतीने काढा ATM कार्डशिवाय पैसे
· सर्वात आधी ATMम्ध्ये जाऊन पैसे काढण्याचा पर्याय निवडा.
· पैसे काढण्याचा पर्यंत निवडल्यानंतर एटीएमच्या स्क्रिनवर UPI चा पर्याय निवडा.
· त्यानंतर तुम्हाला एटीएम मधीनच्या स्क्रिनवर QR कोड दिसेल,
· तुमच्या फोनमधील UPI पेमेंट ऍपच्या मदतीने समोर स्क्रिनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करा.
· तुम्हाला जेवढ्या रकमेची कॅश काढायची आहे ती रक्कम निवडा.
· proceed पर्यायावर क्लिक करा.
· तुमचा युपीआय पीन विचारला जाईल तो भरा आणि काही सेकंदातच तुम्हाला हवी असलेली कॅश तुम्ही ATM बाहेर येईल.
· ही सुविधा देशभर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. Withdraw money without ATM card