Fast delivery service सध्या झटपट होम डिलिव्हरीचा ट्रेंड वाढत चालला आहे आणि या इ कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांना ज्या पद्धतीची सेवा आवडत आहे त्यापद्धतीने सेवा पुरविणा भाग पडले आहे. कारण ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्यात ग्राहकांना नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहे. म्हणूनच फ्लिपकार्टने त्याच्या ऑनलाईन सेवेमध्ये बदल करीत आहे. याबद्दल अधिक माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.
Flipkart News
कोरोनकाळापासून फास्ट ई कॉमर्सची मागणी वाढली
कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनेकदा होम डिलिव्हरी मागवणे ग्राहक जास्त पसंत करत असत. आणि त्यानंतर तर होम डिलिव्हरी अत्यंत वेगात करण्याचा देखील ट्रेंड सुरु झाला. Blinkit, zepto आणि Big Basket सारख्या कंपन्यांनी मार्केटमध्ये ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, डिमार्ट सारख्या कंपन्यांना टक्कर देणारे मार्केट उभे केले.
त्यामुळे ऍमेझॉन सारख्या सर्वात मोठ्यी ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीला स्वतःचे असे वेगळे फास्ट सेवा देणारी ऍमेझॉन प्राईम सेवा सुरु करावी लागली. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी ग्राहकांचा कल ओळखून काम करणे या कंपन्यांना भाग पडले आहे. म्हणूनच आता फ्लिपकार्ट देखील या स्पर्धेत उतरला आहे. याबद्दल अधिक माहिती घेऊ पुढील प्रमाणे! Fast delivery service
फ्लिपकार्टची फास्ट सेवा | Flipkart News
फ्लिपकार्ट या कंपनीची सुरुवात बँगलोर कर्नाटका येथील सचिन बन्सल व बिन्नी बन्सल या जोडीने 2007 मध्ये केली. यावेळी या ई कॉमर्स कंपनीच्या स्पर्धेला ऍमेझॉन, डिमार्ट, मेशो सारख्या काही कंपन्या होत्या. परंतु अगदी कमी वेळातच ग्राहकांना उत्तम ऑनलाईन प्रोडक्ट मिळवून देत ही कंपनी ऍमेझॉनला टक्कर देऊ लागली. आता मात्र या कंपनीने 15 मिनिटांत डिलिव्हरी सुविधा सुरु करण्याचे जाहीर केले आहे. Fast Minutes